ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

बहुजन जनता दलाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ९ ठिकाणी यशसंपादन करीत ग्रामीण भागाच्या राजकारणात सक्रिय. पंडितभाऊ दाभाडे

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

पुणे – ( इंडिया 24 न्यूज ) : दि. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुजन जनता दलाने सरपंच पदासाठी ७३५ व ग्रामपंचायत सदस्या साठी ९८६ असे एकूण १७२१ उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करण्यात आले होते राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ९ ठिकाणी बहुजन जनता दलाने यशसंपादन करीत विजय मिळवत बहुजन जनता दलाने आपलं महत्त्व सिद्ध केले असून राज्यातील ग्रामीण भागाच्या राजकारणात बहुजन जनता दलाने सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी दिली
बहुजन जनता दलाचे नवनिर्वाचित विजय झालेले उमेदवार शामराव तुकाराम अडघते (ग्रामपंचायत मोहाडी.) निलेश दादाराव नेमाडे (ग्रामपंचायत नायगाव). रुपेश केशव जाधव( ग्रामपंचायत मसूद). मदन बापू कोळी (ग्रामपंचायत बुलंदी.) राजेश किसन बागडे (ग्रामपंचायत सदामपुर). प्रशांत संजय भुतेकर (गट ग्रामपंचायत भुतेकर वाडी). श्रीमती सुरेखा दादाराव पाटील (ग्रामपंचायत शिंगडगाव). सौ सरस्वती अजाबराव गाडेकर (ग्रामपंचायत मरळगाव) सौ सुमन काशीराम मदनकर (ग्रामपंचायत वाडुम.) या ठिकाणी बहुजन जनता दलाचे उमेदवार विजयी झाले असून अनेक ठिकाणी १५ ते २५ मताने बहुजन जनता दलाचे उमेदवार पराभूत झाले असून विशेष म्हणजे बहुजन जनता दलाच्या कुठल्याही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही विजय झालेल्या ग्रामपंचाय उमेदवारांचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे स्वागत केले असून नवनिर्वाचित निवडून आलेल्या उमेदवारांचे बहुजन जनता दलाच्या वतीने लवकरच त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.