ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 30 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त);* धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) यांचे मार्फत प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, धुळे येथे गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत रोजगार मेळावा (प्लेसमेंटचे) आयोजित केले आहे. यासाठी वैभव प्लेसमेट, व गोविददास एचआर सर्व्हिसेस या कंपनीतील विविध पदासाठी 850 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून धुळे जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्रॉईव्ह-10 पर्याय (2023-2024) धुळे यांची निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी.

तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वयम www.mahaswayam.gov.in पोर्टलच्या विविध लाभार्थी घटक जसे उमेदवार,उद्योजक, नियोक्ते इत्यादीने या संकेतस्थळावर नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावती करणे, रिक्तपदे अधिसूचित करणे, रिक्तपदास अनुसरुन ॲप्लाय करणे, तसेच युवक व विद्यार्थी यांना करिअरविषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहनपर कार्यक्रम यामध्ये इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करण्यात देण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन सुरु करण्यात आला आहे. या हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 18001208040 असा आहे. हा हेल्पलाईन सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळासंबंधी संदिप बोरसे 9822299844 तसेच www.ncs.gov.in संकेतस्थळासंबंधी मुकेश बोरसे 8600303487 तर वर संपर्क साधावा.याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून गुरुवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे, प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, धुळे येथे उपस्थित राहावे. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त श्री. वाकुडे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.