ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळण्यासाठी कामात दिरंगाई का ?

▪️शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळण्यासाठी कामात दिरंगाई का ?

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

नवी मुंबई :- (इंडिया 24 न्यूज )स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष मा.श्री .उमेश जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री .राजेश नार्वेकर यांना पत्र देण्यात आले. स्वराज्य पक्षाकडुन सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालू आहे , परंतु अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस पाऊल उचलेले दिसून येत नाही.
स्वराज्य पक्षाकडुन सातत्यपूर्ण पाठपुरावा चालला होता परंतु काही प्रतिसाद न मिळाल्याने दिनांक २४ नोव्हेंबर रोजी स्वराज्य पक्षाकडून नवी महानगरपालिका मुखयालयात आदोलन करण्यात आले होते त्यावेळी मा.श्री घनवट साहेब उपायुक्त शिक्षण विभाग लेखी पत्र देत सांगण्यात आले की , नवी मुंबई महानगरपालिका शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापैकी वह्या , बूट , बॅग हे साहित्य तीन ते चार आठवड्यात वाटप केले जाईल त्याप्रमाणे शालेय गणवेश वाटपाची निविदा चालू असून पाच ते सहा आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.


शैक्षणिक हिताच्या दृष्टीने बघितल्यास ही बाब चिंतेची आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थीची अवस्था दयनीय झाली आहे.जगातिक स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. सर्वसामान्य तसेच गरीब कुटूंबाच्या पालकांना शिक्षणाचा खर्च उचलणं अवघड जातं, त्यानंतरही अनेक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काटकसर करून पैसा जमा करून खर्च करतात,अशावेळी गोरगरीब विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश घेणे परवडणारे नाही म्हणून पालक आपल्या पाल्याला महानगरपालिकेच्या शाळेत पाठवत असतात पण यावर्षी महानगरपालिकेने शैक्षणिक साहित्य व गणवेश विद्यार्थ्यांना आज तागायत वर्ष संपत आले असताना देखील दिले गेले नाही याला जबाबदार कोण ..?
एकीकडे शाळा देखभालीसाठी लाखो रुपये खर्च महानगरपालिका करत आहे व त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध शैक्षणिक वस्तू देण्यामध्ये दिरंगाई होत असताना दिसून येत आहे , सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे ? मुलाचे शैक्षणिक गुणवत्ता व पाठबळाची सनद पुरवायची तरी कशी..? हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न भरून येण्यासारखे आहे.
तरी आपण महानगरपालिकेच्या एकूण ७९ शाळेमधील ४७९८६ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची बाब लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळण्यासाठी कामात दिरंगाई व कसुराई करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी ही अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मा.आयुक्त साहेबांनी सकारत्मक प्रतिसाद देत सांगण्यात आले की, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
यावेळी उपस्थित स्वराज्य पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश जुनघरे , समाजसेवक मयुर धुमाळ , विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनायक जाधव , नवी मुंबई सरचिटणीस आशिष मोरे , तसेच कार्यकर्ते वंदन कोळी , साईराज ढवळे इत्यादी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.