ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️५१ वे जिल्हा विज्ञान प्रदर्शन बक्षीस समारंभ संपन्न..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

पालघर – ( इंडिया 24 न्यूज ) :
पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पालघर जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळ व थीम ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 जानेवारी 2024 ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न झालेल्या 51 व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा सांगता समारंभ आज संपन्न झाला.

समारोप प्रसंगी पालघर जिल्हा गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे मंडळाचे कार्यकर्ते, शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी संगीता भागवत, उपशिक्षणाधिकारी मते सर तसेच थीम ग्रूप ऑफ इन्स्टिट्युट चे व्हॉईस चेअरमन महमद शरीफ थीम , राणा सर, सरोदे सर,सर्व शाखांचे प्रिन्सिपॉल, एन,एस.एस चे विद्यार्थी , सर्व प्राध्यापक वर्ग,,जिल्यातील आठ तालुक्यातील आलेले बालवैज्ञानिक, मार्गदर्शक शिक्षक,, विज्ञान जत्रेतील सर्व स्पर्धक यांचे आभार मानले.
समारोप प्रसंगी नीलिमा डावखरे,जिल्हा परिषद सभापती मनिषातताई निमकर,रोहिणी ताई सांबरे,जिल्हा परिषद सदस्या आणि विविध क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती, संस्थेच्या वतीने पुंडलिक सरोदे यांनी माहिती दिली. विज्ञान मंडळाच्या वतीने निबंध स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,पोस्टर पेंटिंग,सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.

तीन दिवस चाललेल्या विज्ञान प्रदर्शनात परिसरातील विद्यार्थी,पालक व बोईसर परिसातील ग्रामस्थांनी प्रदर्शन अहण्यासाठी गर्दी केली होती .खासदार राजेंद्र गावित,जिल्हापरिषद अध्यक्ष प्रकाश निकम,उपाध्यक्ष पंकज कोरे ,जिल्हापरिषद सदस्य यांनीही उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवली. आठ तालुक्यातून प्रार्थमिक,माध्यमिक व शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर यांनी समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषय अंतर्गत पाच उपविष्यानुसर 76 प्रकल्प मांडण्यात आहे.

▪️राज्यस्तरावर खालील प्रकल्प निवडण्यात आहे. माध्यमिक विभाग..
▪️स.दा.वर्तक विद्यालय बोईसर स्मॉल प्लॅन्ट मॉनिटर सिस्टीम 2) कै.कृष्णा मोरू पाटील विद्यालय नालासोपारा,शेनाद्वारे प्रतिबंध..
▪️सेंट मेरीज हायस्कूल डहाणू हाई टेक ब्रीज प्रार्थमिक विभाग..
▪️न्यू इंग्लिश स्कूल एम.जी.रोड वसई अप्पर डीप्पर लाईट..
▪️डॉ.होमी भाभा विद्यालय तारापूर बहुउपयोगी चाळणी..
▪️जि. प. शाळा तनाशी
कव्हेअर बेल्ट आदिवासी विभाग माध्यमिक विभाग – शासकीय मत्स्यव्यवसाय माध्यमिक विद्यालय सातपाटी बहुउद्देशीय यंत्र प्रार्थामिक विभाग आदर्श विद्यामंदिर केळवे सफाई यंत्र दिव्यांग विभाग उत्कर्ष माध्यमिक विद्यालय विरार शैक्षणिक साहित्य..
▪️प्रार्थामिक शिक्षक – अजित विश्राम दळवी जि. प.शाळा नवली..
▪️माध्यमिक शिक्षक – हेमाली विठ्ठल भंडारी,अनुदानित आश्रम शाळा झरी त्रिकोण मिती..

▪️प्रयोगशाळा परिचर
अशोक शंकर पवार माध्यमिक आश्रम शाळा वावर , जव्हार जिवाणू विषाणू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कदम यांनी केले तर आभार गणेश प्रधान यांनी मानले राष्ट्रगीताने प्रदर्शनाची सांगता करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.