ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

पाचशे रुपयांत गॅस सिलेंडर द्या महिला काँग्रेसतर्फे आंदोलन

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सबका साथ सबका विकासची घोषणा दिली मात्र वास्तविकता वेगळी आहे
ज्या राज्यात निवडणुका होत आहे त्या राज्यातील जनतेला साडे चारशे (450) ते पाचशे (500) रुपयांना गॅस सिलेंडर उपलब्ध केल्या जात आहे
मात्र महाराष्ट्राच्या जनतेला या सुविधे पासून वंचित ठेवल्या जात आहे.
यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद व शहर महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के ,जिल्हा महिला महासचिव पदमा त्रिवेणी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निर्देशने करीत पाचशे (500) रुपयाला गॅस सिलेंडर उपलब्ध करा ही मागणी करीत तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले

नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधानांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास साडे चारशे (450) रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली

व राजस्थान येथील मुख्यमंत्र्यांनी 01 जानेवारी 2024 पासून राज्यातील उज्जवला गॅस धारक व बीपीएल श्रेणीतील नागरिकांना
साडे चारशे रुपयांना गॅस सिलेंडर देणार असल्याचे घोषित केले.

महाराष्ट्रा लगतच्या तेलंगणा राज्यात रेवंत रेड्डी राज्यातील सर्व जनतेला पाचशे रुपयात स्वयंपाक गॅस सिलेंडर देण्यास सुरुवात केली आहे.

आजघडीला महाराष्ट्रात भीषण परिस्थिती असून ज्या महिला स्वतः काम करवून कुटुंबाचा गाडा चालवितात त्यांना मजुरीपोटी केवळ तीन ते चार हजार रूपयेच मिळतात यामुळे नवशे पाच रुपयांचा (905) गॅस सिलेंडर घेतल्यास कुटुंबाचा अन्य खर्च कसा भागवायचा हा प्रश्न उपस्थित होत असल्याने नाईलाजाने महिला परत चूल व कोळसा शेगडीकडे वळत आहे
ही गंभीर परिस्थिती असल्याने महाराष्ट्रात ही पाचशे (500) रुपयात उपलब्ध व्हावा ही महिला काँग्रेसची मागणी आहे.

या आंदोलनात दुर्गा पाटील जिल्हा सचिव,मंगला बुरांडे जिल्हा सचिव,वैशाली दुर्योधन,शिल्पा गोहिल,प्रीती तामगाडगे,निलिमा वाघमारे,कविता उंदिरवाडे,भाविका आटे,कल्पना ठाकरे,चंदा दुर्गे,बेबीताई मारेकर,वंदनाताई क्षीरसागर,प्रियंका धुप्पे,लक्ष्मीबाई गोदारी,अनिता मुंढे,मिना कार्लेकर,दुर्गा आत्राम,मंगला उगे,सिमा भगत,कविता कामतवार,सोनू वैद्य,अरुणा गोगला,शोभाताई कोकरे,करुणा नरवाडे,कल्पना बेहरे,कल्पना लोने,बदामी निषाद,फुलकुमारी निषाद,अश्विनी धुर्वे,शकिला पठाण,लुबना शेख,सुमन निषाद,सारक्का गोदारी,ममता वांढरे,सरगंधा रामटेके,अंजुबाई बावसकर,शोभा बाई,आरती बाई,रेखा बाई व मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.