ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मराठा भूषण पुरस्कारा साठी मराठायोद्धा गजानन हरणे यांची निवड..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन, मराठायोद्धा गजानन ओंकारराव हरणे यांची सन 2023 चा मराठा भूषण पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठा सेवा संघच्या वतीने निवड करण्यात आली हा पुरस्कार 12 जानेवारी 2024 ला जिजाऊ , स्वामी विवेकानंद जयंती समारंभामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिल्या जाणार असल्याचे पत्र गजानन हरणे यांना प्राप्त झाले असून पुरस्कारा सनमानचिन्ह गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.गजानन हरणे हे गेल्या 30 वर्षापासून विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब, दिन दलित, दिव्यांग, वंचित लोकांसाठी शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. तसेच मराठा आरक्षण मिळावे म्हणून सतत सहा दिवस अन्नत्याग आंदोलन करून मराठा समाजासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे.त्यांच्या या समर्पित त्याग भावनेने काम करण्याच्या कार्याची दखल घेऊन आज पर्यंत शंभरच्या वर पुरस्कार भारत सरकार, राज्य शासन ,विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले आहे.

नुकताच दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी यांच्यावतीने 39 व्या राष्ट्रीय दलित साहित्यकार सामाजिक संमेलनात पंचशील आश्रम दिल्ली येथे गजानन हरणे यांना सन्मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवार्ड देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते गौरवण्यात, सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षीचा मराठा भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल हा प्रतिष्ठेचा मानाचा सन्मान मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था संघटनेचा वतीने आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.