ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 29 जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे : दिनांक 11 जानेवारी, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरील भरती होण्यासाठी पात्र उमेदवाराची कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 29 जानेवारी,2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील (निवृत्त) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 1 फेब्रुवारी,2024 ते 15 एप्रिल,2024 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 62 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात येते. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे सोमवार, दि. 29 जानेवारी,2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन सीडीएस 62 कोर्ससाठी प्रवेश्पत्र व त्यासोबत संबंधित परिशिष्ट उपलब्ध होईल. कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.

सीडीएस वर्गामध्ये प्रवेशासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग,नवीदिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस या परिक्षेकरिता ऑनलाइनद्वारे अर्ज केलेला असावा. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व्हॉटअप 9156073306 ईमेल training.pctcnashik@gmail.com वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.