ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

समाजसेवक गजानन हरणे व प्रमोद धर्माळे यांचा उपोषणाचा तिसरा दिवस प्रकृती चिंताजनक..

▪️भजन आंदोलनाने निगरमठ्ठा प्रशासनाश जागृत केले. उद्या मुडन आंदोलन..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभुळकर
अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : स्थानिक तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्या सात वर्षापासून दयनीय अवस्था असून या रस्त्याच्या खराबीमुळे अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. तरीसुद्धा शासनाने हा रस्ता अडवून ठेवलेला आहे.या परिसरातील नागरिक या खड्ड्यामय रस्त्यामुळे त्रस्त झाले असून हा रस्ता व्हावा म्हणून नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्रमंडळाच्या वतीने शासन, प्रशासनास , जन प्रतिनिधी यांना पाच वेळा निवेदन दिले आहेत. तसेच अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु शासनाने आश्वासने देऊन आंदोलने संपवली परंतु तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे नाईलाजने दिनांक 29 जानेवारी 2024 वार सोमवार पासून तुकाराम चौकात

नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्र मंडळ व निर्भय बनो जण आंदोलनच्या वतीने मराठायोद्धा समाजसेवक व निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, तसेच नगरसेवक मंगेश भाऊ काळे मित्र मंडळाचे संयोजक प्रमोद धर्माळे, शिवसेना शहर सचिव अविनाश मोरे हे या रस्ता , पाईपलाईन दुरुस्ती व स्ट्रीट लाईट ची कामे त्वरित पूर्ण व्हावी म्हणून तीन दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु निगरमठ्ठ प्रशासन मात्र उपोषणाला साधी भेट देण्याचे चर्चा करण्याचे औचित्य करीत नाही. पहिलेच या रस्त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करून रस्ता खराब करायचा व नंतर मात्र त्या रस्त्यावर काम करायचं नाही अशा पद्धतीचे दुटप्पी भूमिका मनपा व बांधकाम विभाग घेत असल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून जनप्रतीच्या विरोधात प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे उपोषणाची दखल प्रशासनाने या गंभीर बाबीची दाखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र केल्या जाईल अशा गंभीर इशारा उपोषण कर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे. आजच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मंगेश काळे, पंकज जायले, नम्रता धर्माळे, रेखा देशमुख, देवश्री ठाकरे, लता कवर, बाळू पाटील मनीषा दंडगव्हाण जयश्री, अंजली देशमुख, कुलकर्णी, जिजा नरवाडे, सुनिता गावंडे, कमलजीत कौर, केलविन सुबि, नंदकिशोर गावंडे, शाम रेळे ,,आदिनी साखळी उपोषण केले. तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागृत करण्याकरता आज उपोषण स्थळी अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला. त्यांच्या या उपोषणाला समर्थन म्हणून अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण करून या उपोषणास समर्थन दर्शविले. तसेच गावकऱ्यांनी भजन आंदोलन करून स्वस्त प्रशासनास जागृत करण्याचे काम उपोषण स्थळी केले. तरीही प्रशासन सुस्त झोपलेले आहे. या झोपलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना जागृत करण्या करीता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन हा रस्ता व या रस्त्यावरील कामे त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलन या पेक्षा शिवसेना स्टाईलने तीव्र केल्या जाईल याची सर्वांश्री जबाबदारी

शासनाची राहील असा इशारा नगरसेवक मंगेशभाऊ काळे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. तरी शासन यावर काय निर्णय घेते याकडे मलकापूर खडकी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. आज तिसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन समर्थ केले त्यामध्ये येवता, कातखेड, येळवण, कानशिवनी आदि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह या रोडवर असलेल्या गावाच्या नागरिकांनी जाहीर पाठिंबा देऊन साखळी उपोषण केले. हजारो जागरूक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन या उपोषणाला समर्थन व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.