आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️रन फॉर पांझरा मॅरेथॉन मार्गावरील वाहतुक 4 फेब्रुवारीला तात्पुरत्या स्वरुपात बंद..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने 4 फेब्रुवारी, 2024 रोजी रन फॉर पांझरा अंतर्गत धुळे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 किमी, 5 किमी, 10 किमी, 21.1 किमी अशा चार विभागात होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्याकरीता मॅरेथॉनच्या मार्गावरील वाहतुक दुचाकी वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत सरकारी वाहने व आपत्कालीन विभागाची वाहने वगळता सर्व वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. धुळे शहर वासियांनी उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला व पुरुष असे मोठया संख्येने भाग घेणार आहेत. ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी 5 वाजता पोलीस कवायत मैदान येथुन सुरु होवुन बारापत्थर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाला वळसा घालुन जुना आग्रा रोड वरुन मोठया पुलमार्गे दत्त मंदिर चौक, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदुर रोड, गोंदुर गाव येथुन त्याच मार्गाने परत येणार आहे. या स्पर्धेच्यावेळी मॅरेथॉन मार्गावर मोठी वाहने आल्यास स्पर्धेत अडथळा निर्माण होवून अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने पुढील प्रमाणे वाहतुकीचे मार्ग हे दुचाकी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मॅरेथॉनचे दिवशी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येणार आहेत.

तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग -* फाशीपुल कडुन पोलीस मुख्यालयाकडे येणारा रस्ता, स्टेशन रोड येथे महात्मा फुले पुतळयाकडे येणारा रस्ता, बस स्थानक टॅक्सी कॅबीन स्टॅण्ड समोरील रस्ता, मामलेदार कचेरी येथे बारापत्थर,पाचकंदिल येणारा रस्ता, लोकमान्य हॉस्पीटल येथे चाळीसगांव रोडकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाकडे येणारा रस्ता, अग्रसेन पुतळा येथे मालेगांव रोडकडून येणारा रस्ता, नगांवबारी येथे दत्त मंदिराकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत आहे.

तसेच गिंदोडीया चौकाकडून पारोळारोड कराचीवाला खुंटकडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग, धुळे शहर जुनी महानगर पालिकेकडून कराचीवाला खुंटकडे वाहतुकीचा मार्ग, आग्रारोड दत्त मंदिर चौकाकडे येणारा वाहतुकीचा मार्ग, गांधी पुतळयाकडून येणारी वाहतुक बंद करण्यात येत आहे, पंचवटी कॉर्नरकडे शहरातुन येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येत आहे, वलवाडी टि पॉईन्ट कडून स्टेडीयम कडे येणाऱ्या वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येत आहे., गोंदुर गावाचेपुढे अर्ध मॅरेथॉनचे टर्न पॉईन्ट येथुन वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात येत आहे.

तसेच तीनचाकी, चारचाकी सोनगीर कडून येणारी वाहने पारोळा रोड मार्गे शहरात तेथुन 80 फुटी रोडने रेल्वे स्टेशन मार्गे फाशीपुल, संतोषा माता चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे बस स्थानक व परत त्याचमार्गे परत जातील. तसेच चाळीसगांव कडून येणारी वाहने लोकमान्य चौकातुन रेल्वेस्टेशन मार्गे फाशीपुल, संतोषा माता चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग बसस्थानक व परत त्याचमार्गे परत जातील. नाशिक कडून येणारी वाहने हे रेल्वेस्टेशन मार्गे फाशीपुल, संतोषा माता चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे बसस्थानक व परत त्याचमार्गे परत जातील.

मॅरेथानसाठी येणाऱ्या स्पर्धकांची वाहने ही बसस्थानकाची मोकळी जागा हनुमान मंदिर समोर, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा जुनी पोलीस लाईन मध्ये, रेस्ट हाऊस 2 जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या बंगल्याजवळ, पोलीस मुख्यालय वायरलेस ऑफीस चौक, पोलीस मुख्यालय मेस समोरील परीसर अशा ठिकाणी स्पर्धकांनी आपली वाहने पार्किगकरुन घ्यावी. असे श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.