आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️न्युक्लीअस बजेट अंतर्गत लाभासाठी आदिवासी लाभार्थ्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे..

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

धुळे, दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे कार्यक्षेत्रातील धुळे,शिंदखेडा,साक्री व शिरपूर तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्युक्लिअस बजेट योजनेत युवकांना क्रिकेट खेळ साहित्य, भजनी मंडळांना धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमासाठी भजनी साहित्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 15 फेब्रुवारी,2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

क गटात 500 युवकांना क्रिकेट खेळ खेळण्याकरिता क्रिकेट साहित्य संच, 500 भजनी मंडळांना धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भजनी साहित्य देण्यात येणार आहे.वरील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,धुळे 24 बडगुजर प्लॉट, राम सर्जिकल हॉस्पिटल शेजारी, 80 फुटी रोड, पारोळा चौफुली जवळ, धुळे येथे 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी,2024 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील. तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी,2024 पर्यंत स्विकारले जातील. मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्विकारले जाणार नाहीत.

पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज मागणीसाठी क्रिकेट टिम योजनेचा लाभ घेण्यासाठी टिमची यादी, भजनी मंडळाची यादी सोबत आणावी. योजना निहाय आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.