आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

घुग्घूस नगरपरिषदेच्या कर्मचारी समावेशनात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची तातळीने चौकशी करा !

काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी..

*🔻श्री. अरविंद चहांदे*

*🔻चंद्रपूर तालुका उप प्रतिनिधी*

*🔻मो. नं. 9405714165*

घुग्घुस : नगरपरिषदेत ग्रामपंचायत कार्यकाळात कार्यरत कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाले असून सदर समावेशन प्रक्रियेवर तातळीने स्थगिती आणून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केली आहे

जवळपास 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या संघर्षाला यश मिळून घुग्घुस ग्रामपंचायतचे रूपांतर 31/12/2020 रोजी नगरपरिषदेत झाली शासन नगर विकास विभागाने 10/02/2022 रोजी घुग्घुस नगरपरिषदेच्या आकृतीबंधास मान्यता दिली त्यानुसार दिनांक 12/01/2024 रोजी समावेशन आदेश पारित करण्यात आला यामध्ये घुग्घुस शहरातील स्थानिक युवकांवर प्रचंड अन्याय झाला आहे
नगरपरिषदेच्या प्रथम उदघोषणा नंतर म्हणजेच 31 ऑगस्ट 2020 रोजी व अंतिम उदघोषणा पूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पूर्वी
नियुक्ती मिळाल्याच्या कारणावरून सतीश सागर मुरार नाली सफाई कर्मचारी व अमोल विठ्ठल जुनारकर शिपाई या घुग्घुस निवासी युवकांवर अपात्रतेची कारवाई केली आहे.

सदर युवकांना ग्रामपंचायत नमुना 24 च्या आकृती बंधावर घेण्यासाठी दिनांक 28/05/2020 रोजी ठराव घेण्यात आला व यांना 01/09/2020 रोजी नियुक्ती देण्यात आली मात्र बाहेरून राजकीय वशीलयाच्या भरवश्यावर ग्रामपंचायतेत आलेला दिनेश अनिल बावणे यांचा ठराव 29/06/2020 चा असतांना व ठरावात स्पष्टरित्या बावणे यांची नियुक्ती सप्टेंबर महिन्यात करण्यात येईल असे स्पष्ट लिखित असतांना बावणे यांची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात करून त्यांची नोकरी वाचविण्यात आली ?

मात्र स्थानिक युवकांचा ठराव बावणे यांच्या एक महिन्यापूर्वीचा असतांना त्यांना अपात्र का करण्यात आले ?

सदर सनावेशनात वरीष्ठतेनुसार ही नियुक्ती झाली नसून काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त यादीत टाकल्याने त्यांचा ही आक्षेप आहे.
सदर समावेशना पूर्वी कर्मचाऱ्यां कडून नगरपरिषदेच्या एका लिपिकाने श्रेणीनुसार पस्तीस हजार व पंचवीस हजार रुपये जमा केल्याचे व अपात्र कर्मचाऱ्यांचे पैसे परत दिल्याचे चर्चा संपूर्ण शहरात शुरु असून अनेक कर्मचाऱ्यांनी खाजगीत कबूल ही केले आहे
मात्र दडपशाहो व दबावाखाली असल्याने कर्मचारी समोरासमोर बोलण्याचे धाडस करीत नाही
मात्र याची चौकशी केल्यास संपूर्ण भ्रष्टाचाराचे उलगडा होईल.
कृपया या सदर प्रकरणाकडे तातळीने लक्ष देऊन समावेशनावर स्थगिती आणावी व दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली असून सदर अन्यायग्रस्त युवकांना न्याय न मिळाल्यास नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारा विरोधात काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा ही काँग्रेस नेत्यांनी केला आहे
सदर शिष्टमंडळात काँग्रेस नेते अलिम शेख,सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवर,विशाल मादर,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.