ताज्या घडामोडी

नेतृत्व चंदुलाल घरत सर नीलिमाताई डावखरे यांचे प्रतिपादन..

 

संपादक – शिल्पा दूरदृष्टीचेबनपुरकर

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आदरणीय चंदुलाल घरत सर यांचा भव्य सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अभिनव विद्यालय विराथन बु . ता. पालघर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मा. दामोदरजी पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सोनोपंत दांडेकर कॉलेज पालघरचे प्राचार्य डॉक्टर किरणजी सावे , आगरी सेना जनरल सेक्रेटरी मेघनाथ पाटील, जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वागेशजी कदम, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमाताई डावखरे, माजी आरोग्य व बांधकाम सभापती सुरेशजी तरे, लायन्स क्लब ऑफ सफाळे माजी अध्यक्ष अनंत वर्तक, आगरी सेना महिला आघाडी प्रमुख नयना घरत मॅडम, विराथन गावच्या सरपंच अंजली किणी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले. घरत सरांच्या आज पर्यंतच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. घरत सरांची कन्या डॉक्टर प्रीती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ठाणे, मीरा-भाईंदर, कसारवडवली,
वाघबील या परिसरात घरत सरांनी केलेले शैक्षणिक कार्याला उजाळा देत असताना व जीवनत करावी लागणारी कसरत त्या वेळची आर्थिक परिस्थिती वडिलांचे प्रेम आणि त्यांची जगण्याची उमेद व कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची बाबांची हिंमत अशा अनेक गोष्टींना उजाळा देत असताना मात्र प्रेक्षकांचे डोळे मात्र पाणावले. यावेळी नीलिमाताई डावखरे बोलत असताना म्हणाल्या की माझे सासरे वसंत डावखरे (बाबा) व घरत सर यांच्या विचारा मध्ये बरेच साम्य असल्याचे त्या बोलत होत्या. दोघे पण दूरदृष्टीचे नेते असल्याचे मत त्यांनी मांडले. या शुभप्रसंगी अनेकाने आपले मनोगत व्यक्तत केले. सदर प्रसंगी शैक्षणिक सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या भव्य नागरिक समारंभाला उपस्थित होते.सत्काराला उत्तर देत असताना घरत सर अगदी मनमोकळ्या पद्धतीने आज पर्यंत जीवनाचा प्रवास आगरी सेनेमधील 40 वर्षाचा प्रवास आजी-माजी विद्यार्थ्यांनी केलेले प्रेम मी काढलेल्या आजपर्यंत शाळा आणी त्या शाळेतील शिक्षक माझे कुटुंब ते राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रातील योगदानयांना उजाळा देऊन सत्कार समितीचे आभार मानले . माझ्यावर प्रेम करणारे उपस्थित असलेल्या सर्वांचे ऋण व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील व जगदीश किणी यांनी केले तर आभार मनोहर पाटील यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.