ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️समाजसेवक गजानन हरणे व प्रमोद धर्माळे यांचा उपोषणाचा सातवा दिवशी प्रकृती खालावलीच, तरी उपोषणावर ठाम…

▪️मलकापूर शंभर टक्के कडकडीत बंद ! किन्नर चा पाठिंबा. ढोल वाजवून गाणे म्हणून शासनाचा केला निषेध...

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : स्थानिक तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्या साठी सात वर्षापासून दयनीय अवस्था असून अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. तरीसुद्धा शासनाने हा रस्ता राजकीय श्रेयासाठी अडवून ठेवलेला आहे.या परिसरातील नागरिक या खड्ड्यामय रस्त्यामुळे त्रस्त झाले असून हा रस्ता व्हावा म्हणून निर्भय बनो जन आंदोलन व नगरसेवक मंगेशभाऊ काळे मित्रमंडळाच्या वतीने हा रस्ता त्वरित व्हावा म्हणून शासन, प्रशासनास , जनप्रतिनिधी यांना पाच वेळा निवेदन दिले आहेत. तसेच अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु शासनाने आश्वासने देऊन आंदोलने संपवली परंतु तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे नाईलाजने दिनांक 29 जानेवारी 2024 वार सोमवार पासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा सातवा दिवस तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही व या रस्त्याचे काम मंजूर असताना सुद्धा सुरू केले जात नाही. कारण स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांना तंबी दिल्यामुळे ,सांगितल्यामुळे ठेकेदारास जाणून बुजून वर्क ऑर्डर दिला जात नाही. याच्या विरोधात मराठायोद्धा समाजसेवक व निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, तसेच नगरसेवक मंगेश काळे मित्र मंडळाचे संयोजक प्रमोद धर्माळे, शिवसेना शहर सचिव अविनाश मोरे हे या रस्ता , पाईपलाईन दुरुस्ती व स्ट्रीट लाईट ची कामे त्वरित पूर्ण व्हावी म्हणून सात दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. उपोषणकर्त्यांची डॉक्टराणी तपासणी केल्यानंतर उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्यांना दवाखान्यात भरती होण्याचा सलाईन औषध घेण्याचा सल्ला दिला . उपोषण न सोडल्यास किडन्या जाण्यार असल्याचे सांगितले. दवाखाना भरती होण्याच्या आग्रह केला परंतु उपोषणकर्त्यांनी नम्रपणे नाकारून जिथपर्यंत काम चालू होत नाही तिथपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. आजा निगरमट्ट झोपेच सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांच्या वतीने प्रशासनाचा विरोध करण्यात साठी प्रशासनाचा निषेध करून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मलकापूर परिसरातील सर्व दुकाने प्रतिष्ठाने स्वयंप्रेरणेने बंद ठेवून शासनाचा जाहीर निषेध केला व आमरण उपोषणाला समर्थन दिले. मेडिकल दवाखाना अत्यावश्य सेवा सोडून सर्व प्रतिष्ठान पूर्णपणे बंद ठेवून आमरण उपोषणाला सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रतिष्ठान मालकाचे मंगेशभाऊ मित्र परिवाराच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. आज उपोषण स्थळी किन्नर यांनी भेट देऊन समर्थन व्यक्त केले व शासनाला इशारा दिला रस्त्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आम्ही सुद्धा आंदोलकांसोबत रस्त्यावर उतरू किन्नराणी साखळी उपोषण करून अनेक गाणे म्हणून शासनाचा निषेध व्यक्त केला. स्थानिक भजनी महिला मंडळांनी भजने म्हणून निगरमट्टा शासनाचा निषेध व्यक्त केला. आज अनेक सामाजिक संस्था संघटनांनी पाठिंबा दिला व शासनाचा निषेध व्यक्त केला.

अशा प्रकारचे अनेक विविध आंदोलने या उपोषणाच्या समर्थनार्थ रोज दिवसभर चालू आहे तसेच आज साखळी उपोषण केले.त्यामध्ये मंगेश काळे, कमलजीत कौर, डॉ.कृष्णकांत वक्ते, मनोज राठोड, केदार खरे, प्रफुल्ल आडे , ओम राठोड,निलेश काळंके, सतीश मदनकार, संतोष रंगे, जनार्दन राऊत, विलास शिंदे , मधुकरराव वाकोडे, नंदकिशोर गावंडे, केल्विन सीबी, संदीप ढोले, विजय दुर्योधन, बंडू सवंई, जयसिंग ठाकूर, दादाराव पाथरीकर बाळू पाटील ढोले ललित जानोरकर, किसनराव कावरे, संजय दशमुखे, भुजंगराव देशमुख, संजय काळंके, रामराव देशमुख, हरिदास राऊत, सदानंद चिकटे यांच्यासह साठ लोकांनी साखळी उपोषण केले. तसेच निगरमट्ट भ्रष्टाचारी शासनास जागृत करण्याकरता ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो म्हणून नाविन्यपूर्ण आंदोलने करण्यात आले. राजकीय नेत्यांनी श्रेयासाठी हा लढा चालू ठेवू नका श्रेय कोणीही घ्या परंतु जनतेची होणारे हाल थांबवा श्रेयासाठी उपोषणकर्त्यांचे जीव वेठीस धरू नका. स्थानिक आमदारांनी हे काम करू नय अशी संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिलाचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितले आहे त्यांच्यामुळेच काम लेट होत असल्याचे सांगितले त्याची संपूर्ण परिसरात चर्चा चालू झाली आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो व रस्ता होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा इशारा उपोषण करते समाजसेवक गजानन हरणे यांनी दिला आहे.

परंतु ज्या विभागाशी हा प्रश्न निगडित आहे त्यांनी साधे चर्चेचे अवचित दाखवले नाही. बांधकाम विभागचे अधिकारी मात्र भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत त्यांना मात्र उपोषणा स्थळाला साधी भेट देण्याचे चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही. . पहिलेच या रस्त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करून रस्ता खराब करायचा व नंतर मात्र त्या रस्त्यावर काम करायचं नाही अशा पद्धतीचे दुटप्पी भूमिका महानगरपालिका व बांधकाम विभाग घेत असल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाच्या या दुपटी धोरणा विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी उपोषणाची दखल प्रशासनाने या गंभीर बाबीची दाखल घ्यावी.

आजच्या उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागृत करण्याकरता आज उपोषण स्थळी अनेक राजकीय ,सामाजिक संघटनेच्या मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला. त्यामध्ये शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी या उपोषणाला समर्थन म्हणून भेट देऊन उपोषण कर्त्यांशी चर्चा केली यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. निगरमट्ट शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण करून या उपोषणास समर्थन दर्शविले. तसेच स्थानिक महिला मंडळ व गावकऱ्यांनी भजन आंदोलन करून सुस्त प्रशासनास जागृत करण्याचे काम उपोषण स्थळी केले. तरीही प्रशासन सुस्त झोपलेले आहे. या झोपलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना जागृत करण्या करीता आमरण उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन हा रस्ता व या रस्त्यावरील कामे त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलक या पेक्षा शिवसेना स्टाईलने सोमवारी तीव्र केल्या जाईल याची सर्वांश्री जबाबदारी शासनाची राहील असा इशारा नगरसेवक मंगेशभाऊ काळे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.