ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

घुग्घूस नगरपरिषदेच्या कर्मचारी समावेशनाला स्थगिती मिळवून द्या

विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांना निवेदनातून काँग्रेसची मागणी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घुस : ग्रामपंचायत काळातील कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत समावेश करण्याच्या प्रकियेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून समावेशनावर स्थगिती आणण्याची मागणी राज्याच्या विधिमंडळाचे विरोधीपक्ष नेते ना. विजय वड्डेटीवार यांना महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर ,काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी,कामगार,नेते सैय्यद अनवर महिला शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विश्रामगृह चंद्रपूर येथे सदर प्रकरणावर विस्तृत चर्चा करीत निवेदन देत मागणी केली

जवळपास 27 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या संघर्षाला यश मिळून घुग्घुस ग्रामपंचायतचे रूपांतर 31/12/2020 रोजी नगरपरिषदेत झाले शासन नगर विकास विभागाने 10/02/2022 रोजी घुग्घुस नगरपरिषदेच्या आकृतीबंधास मान्यता दिली त्यानुसार दिनांक 12/01/2024 रोजी समावेशन आदेश पारित करण्यात आला यामध्ये घुग्घुस शहरातील स्थानिक युवकांवर प्रचंड अन्याय झाला आहे
नगरपरिषदेच्या प्रथम उदघोषणा नंतर म्हणजेच 31 ऑगस्ट 2020 रोजी व अंतिम उदघोषणा पूर्वी म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पूर्वी
नियुक्ती मिळाल्याच्या कारणावरून सतीश सागर मुरार नाली सफाई कर्मचारी व अमोल विठ्ठल जुनारकर शिपाई या घुग्घुस निवासी युवकांवर अपात्रतेची कारवाई केली आहे.

सदर युवकांना ग्रामपंचायत नमुना 24 च्या आकृती बंधावर घेण्यासाठी दिनांक 28/05/2020 रोजी ठराव घेण्यात आला व यांना 01/09/2020 रोजी नियुक्ती देण्यात आली मात्र बाहेरून राजकीय वशीलयाच्या भरवश्यावर ग्रामपंचायतेत आलेला दिनेश अनिल बावणे यांचा ठराव 29/06/2020 चा असतांना व ठरावात स्पष्टरित्या बावणे यांची नियुक्ती सप्टेंबर महिन्यात करण्यात येईल असे स्पष्ट लिखित असतांना बावणे यांची नोकरी नियुक्ती ऑगस्ट महिन्यात दाखवून त्यांची नोकरी वाचविण्यात आली ?

मात्र स्थानिक युवकांचा ठराव बावणे यांच्या एक महिन्यापूर्वीचा असतांना त्यांना अपात्र करण्यात आले.

सदर समावेशनात वरीष्ठतेनुसार ही नियुक्ती झाली नसून काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त यादीत टाकल्याने त्यांचा ही आक्षेप आहे.
सदर समावेशना पूर्वी कर्मचाऱ्यां कडून नगरपरिषदेच्या एका लिपिकाने श्रेणीनुसार पस्तीस हजार व पंचवीस हजार रुपये जमा केल्याचे व अपात्र कर्मचाऱ्यांचे पैसे परत दिल्याचे चर्चा संपूर्ण शहरात शुरु असून अनेक कर्मचाऱ्यांनी खाजगीत कबूल ही केले आहे
मात्र दडपशाहो व दबावाखाली असल्याने कर्मचारी समोरासमोर बोलण्याचे धाडस करीत नाही
मात्र याची चौकशी केल्यास संपूर्ण भ्रष्टाचाराचे उलगडा होईल.
कृपया या सदर प्रकरणाकडे तातळीने लक्ष देऊन समावेशनावर स्थगिती आणावी व दोषींवर कारवाईची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे

सदर शिष्टमंडळात काँग्रेस नेते अलिम शेख,सोशल मिडिया अध्यक्ष रोशन दंतलवर,रोहित डाकूर,सुजाता सोनटक्के, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

मा. संपादक/ वार्ताहर
वरील मजकूर / बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही विनंती

आपला स्नेही
राजुरेड्डी अध्यक्ष घुग्घुस काँग्रेस

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.