ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

घुग्घुस 30 बेडचा दवाखान्याचे काम नकरण्यासाठी पैसा का रोखला ? काम पूर्ण करुन दवाखाना चालु करा..


🔸अन्यथा आंदोलन करु
शरद मल्हारी पाईकराव
अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी..

*🔹श्री. राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*

घुग्घुस – ( इंडिया 24 न्यूज ) : घुग्घुस आज दिनांक . 26 फेब्रुवारी 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहराचा माध्यमातून मा. कुशाल मेश्राम VBA महाराष्ट्र सदस्य, मा. प्राध्यापक सोमाजी गोंडाणे VBA जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, मा. ॲड.अक्षय लोहकरे VBA जिल्हामहासचिव, मा. धर्मेंद्र शेंडे VBA तालुका अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर मा.शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वामध्ये सार्वजनिक बाधकाम विभाग चंद्रपूर, अभियंता साहेब, शल्य चिकित्सक मा. महादेव चिंचोळे साहेब वैद्यकीय महाविद्यालय डिन मिलिंद कांबळे साहेब, श्रीमती पूनम वर्मा मॅडम कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग चंद्रपूर, यांना निवेदन देण्यात आले.

कार्यकारी अभियंता श्रीमती पुनम वर्मा सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत यांना निवेदन सादर करतांना घुग्घुस येथील दवाखान्याचे काम पूर्ण का झाले नाही तर त्यांनी वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की घुगुस येथील सरकारी दवखान्याचा बांधकामासाठी व विद्यूत पुरवठा करण्यासाठी जो फंड यायचा होता. तो फंड सरकार द्वारे अळविण्यात आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की विद्युत पुरवठा करण्यासाठी जे काही सामान, साहित्य आवश्यक आहे. ते सर्व ठेकेदाराकडे उपलब्ध आहे. परंतु जुन्या कामाचे बिल अजुनही पेंडींग असल्यामुळे तो ठेकेदार खूप घाबरला आहे. कारण त्याच्या कामाचे पैसे त्याला मिळणार की नाही याची त्याला भीती वाटत आहे. आणि जिल्हा अभियंता विद्युत विभाग याच्या कडे जी नियमावली आहे . त्यात सुध्दा स्पष्ट लिहिले आहे की फंड आल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करता येणार नाही. जर असे केले तर सर्वस्वी जिम्मेदार कार्यकारी अभियंता विद्युत विभाग असेल. त्यामुळे घुघुस येथील सरकारी दवखान्याच्या कामास वेळ लावुन घुगूस येथील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे त्यांच्या विश्वासाशी सरकार द्वारे छळ होत आहे.

घुग्घुस शहर हा औद्योगिक शहर म्हणून ओळखले जातो. या घुग्घुस शहरामध्ये पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असुन घुग्घुस शहरात सध्या स्थित असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र हा दवाखाना सहा बेड चा असुन घुग्घुस येथील नागरिकांना दवाखान्याच्या सोयी सुविधा पुरत नसल्याने घुग्घुस येथील रुग्णांना रेफर केल जाते. व घुग्घुस जवळ पास गावातील सुध्दा रुग्ण घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. हा दवाखाना सहा बेड चा असल्याने. घुग्घुस व जवळ पास खेळ्यातील नागरीकांना खुप मोठा नाहकत्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे. आणि ज्यांनी कोणी फंड रोखण्याचे काम केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव हे म्हणतात की आमदार, चषक, खासदार चषक, या फालतु कामासाठी यांच्या कडे फंड मिळतो. परंतु आरोग्याच्या महत्त्व पुर्ण कामासाठी यांच्या कडे फंड नाही. असा आमदार व खासदार जनतेचा कोणत्या कामाचा. जो निवडुन तर यांचा मतानी येतो परंतु निवडुन आल्यावर तोंड सुध्दा दिसत नाही. हि मागणी करत असतांना
रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था व प्रसाधनगृह स्तानगृहाची व्यवस्था करून देण्यात यावे . ही सुद्धा मागणी करण्यात आली. जर का या विषयावर शासन प्रशासन यांनी कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तर वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, व कार्यकारी अभियंता विद्युत विभाग सार्वजनिक बांधकाम शासन व प्रशासनाचा विरोधात तीव्र भुमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलना मध्ये जे काही नुकसान व भरपाईचे जिम्मेदार हे शासन, प्रशासन राहील. तरी सुद्धा लवकरात लवकर अपुर्ण काम सुरू करण्यात यावे.

आम्ही आशा करतो की आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असी वेळ आपण येऊ देणार नाही. आपण ह्या दवाखान्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन दवाखाना सुरू कराल अशी आशा व्यक्त करतो.
असा देखील इशारा देण्यात आला.

यावेळेस निवेदन सादर करतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव एँड. अक्षय लोकरे वंचित बहुजन आघडी तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव शहर उपाध्यक्ष जगदीश मारबते दत्ता वाघमारे योगेश नगराळे महासचिव अशोक भगत कोषाध्यक्ष राकेश पराशिवे संघटक आशिष परेकर आयटी सेल प्रमुख विशाल भगत नकुल निमसटकर सदस्य राकेश कातकर सदस्य व समस्त घुग्घुस वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.