ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

वेकोलीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण करा- आप घुग्घुस

अरविंद चाहादे धुगुस चंद्रपूर तालुका प्रतिनिधि 9405714165

वे.को.ली. वणी क्षेत्रात येणाऱ्या बहिरमबाबा देवस्थान समोरील रोडावर खूप मोठ्या प्रमाणात जड वाहतूकीचे आवागमन सुरू आहे त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत दिसत आहे तसाच वे.को.ली अंतर्गत येणाऱ्या सी.एच.पी. मधून निघणाऱ्या प्रदूषणची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाड झाली असून कॉलरी नंबर 02, बँक ऑफ इंडिया परिसर जास्त प्रभाव पहायला मिळतो आणि या सर्व गोष्टीची सूचना आणि तक्रार स्थानीय नागरिकांनी वारंवार वेकोलीला दिली मात्र आजपर्यंत प्रदूषणावर नियंत्रण दिसत नाही आहे म्हणूनच स्थानीय नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या शहर अध्यक्ष अमित बोरकर कडे निवेदन मार्फत ही मागणी केली आहे लवकरात लवकर या प्रदूषणाचा तोडगा काढण्यासाठी सहकार्य करावे आणि आज आम आदमी पक्षातर्फे वे.को.ली वणी क्षेत्र सब.एरिया साहेबाला निवेदन देऊन ही चितावणी दिली आहे की येणाऱ्या दोन दिवसात बहिरमबाबा देवस्थान समोरील रोडवर होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रण करण्याकरिता प्रत्येक 2 तासात टँकरनी पाणी रोडावर मारण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे येणाऱ्या दोन दिवसात (01 मार्च 2024) ला स्थानीय नागरिकांना घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल
यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे, युवा अध्यक्ष सचिन क्षीरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, सोशल मीडिया अध्यक्ष निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.