ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस , सर्वसामान्यांच्या पदरी निराशा : आमदार सुभाष धोटे.

 

*🔹श्री. राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*

राजुरा – ( इंडिया 24 न्यूज ) : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने येणाऱ्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला मात्र यातून सर्व सामान्य माणसाच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार युवक, महिला, नोकरदार वर्ग, व्यापारी, उद्योजक या सर्वच घटकांना केवळ स्वप्नांचे गाजर दाखविण्यात आले आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालांचे कोसळलेले भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, निधी अभावी अत्यंत खराब अवस्थेतील रस्ते, राज्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, अर्धवट असलेले घरकुल, खुंटलेला औद्योगिक विकास, महाराष्ट्राबाहेर जाणारे प्रकल्प यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस आणि धोरणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत अशी प्रतिक्रिया लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.