ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

एकाच वर्गात शिकत आहे पहिली पासून चौथी पर्यंत विद्यार्थी

महिला काँग्रेसच्या शाळा भेटीत झाला विद्यार्थ्यांना होणाऱ्या नरक यातनेचा उलगडा

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : 2009 साली निर्माण करण्यात आलेल्या कायद्या अंतर्गत अनुच्छेद 21 A नुसार सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना अनिवार्य मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे.
यात विद्यार्थ्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचे आदेश ही देण्यात आले आहे

मात्र घुग्घुस सारख्या औद्योगिक शहरात याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे
पालकांनी तोंडी दिलेल्या तक्रारीच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद व महिला कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,जिल्हा सचिव मंगला बुरांडे,शिल्पा गोहिल यांच्या शाळा भेटीने विद्यार्थ्यांना होणाऱ्या नरकयातनेचे साक्षात्कार महिला काँग्रेसला झाले आहे

शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत एकाच वर्गात पहिली ते चौथी वर्गातील मुलांना गुरं – ढोरा सारख एका अंधाऱ्या खोलीत डांबण्यात आले आहे
येथील वीज कपात करण्यात आली आहे घुग्घुस शहरातील गर्मीची जाणीव असतांना ही या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गर्मीत बसावे लागते.
शाळेत कॉम्प्युटर आहे मात्र वीज नाही
शाळेतील शौचालयाची अवस्था अत्यंत भीषण असून विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागते.
शालेय पोषण व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे
चनाच्या भाजीत पाणीच पाणी व तांदूळ सुद्धा पचपचित व निकृष्ट दर्जाचे आढळून आलेले आहे.

आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजेच या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एकच शिक्षक असून तो स्वता मुख्याध्यापक दिलीप कौरासे हेच आहे
त्यांना यागंभीर प्रकरणाची माहिती विचारली असती त्याने केवळ उडवा – उडवीचे उत्तरे दिली आहे
या संपूर्ण प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा ही जवाबदार आहे
यागंभीर प्रकरणाला घेवुन लवकरच महिला काँग्रेस आंदोलन करणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.