ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️घरकुलासाठी पंचायत समिती समोर ठिया आंदोलन कायम..

▪️घरकुलाचा लाभ मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही - आंदोलकांची ठाम भूमिका

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

सावली – ( इंडिया 24 न्यूज ) :
तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामिण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जिबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापूरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. मात्र अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जिबगाव येथील सरपंच, सचिव व पं.स. अधिकारी यांनी संगणमताने आम्ही पात्र असतांना डाववले असुन अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
या संदर्भात अनेकदा प्रशासनाला निवेदन देवूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी घरकुलासाठी पंचायत समितीसमोर कुटुंबासह ठिया आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात 6 वर्षाच्या मुलांचाही सहभाग असल्याचे दिसुन आले आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती दिली.


ग्रामिण भागातील गोरगरीब दारिद्रय रेषेखालील जनतेला हक्काचे घर असावे या उदात्त हेतुने शासनामार्फत मोदी आवास घरकुल योजना कार्यान्वीत करण्यात आली. त्यात विधवा, परितक्याय अपंग यासह ज्यांना निवारा नाही अशा लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने घरकुलाचा लाभ देण्याचे निकष आहे. मात्र जिबगाव येथील ग्रामपंचायतीने हेतुपरस्पर आम्हाला डावलून घरकुलाचा लाभ दिला नसल्याने आमच्यावर अन्याय झालेला आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही ठिया आंदोलन विविध प्रकारचे आंदोलन करीत झोपी प्रशासन ला जागा करण्यासाठी आंदोलन करीत असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिल्या आहेत. आमची मागणी पुर्ण न झाल्यास यापुढे आंदोलन तिव्र करुन भिकमांगो, मुंडण व अर्धनग्न आंदोलन करुन प्रशासनाला जागे करणार अशी माहिती देण्यात आली होती मात्र


पाच दिवस लोटुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने 26 तारखेला भिकमांगो आंदोलन करण्यात आले तर 27 तारखेला मुंदण आंदोलन करण्यात आले तर आज 28 तारखेला अर्धा नग्न आंदोलन करण्यात येवुन प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन सुरू असुन प्रशासन गाळ झोपेत असल्याने येत्या बुधवार पासुन आमरन उपोषण करणार असल्याचे बोलले जात आहे.आंदोलन स्थळी यावेळी दिलीप अशोक पाल हे कुटुंबासह आंदोलनात सहभागी होते तर विलास नागापूरे, सौ लक्ष्मी खाचणे, जितेश सोनटक्के उपसरपंच डोणाळा, नामदेव भोयर सामाजिक कार्यकर्ते व्याहाड बुज,अरुन जी पाल,दिपक शेंडे आदी आंदोलन स्थळी भेट देऊन आदोलकांची चर्चा करुन आंदोलनाला जाहीर पाठींबा दिले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.