ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️संघटन बळकटीतुन मादगी समाजाचा विकास शक्य : माया मोहूर्ले

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चामोर्शी – ( इंडिया 24 न्यूज ) : पूर्व विदर्भातील खेड्यापाड्यात मादगी समाजबांधव वास्तव्याने राहत असून आर्थिक अडचणीमुळे या समाजाचा विकास झाला नाही तसेच शिक्षणाचे प्रमाण नगण्य असल्याने समाजाचा सामाजिक स्तर अजूनही उंचावला नाही त्यामुळे या समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी संघटन बळकट केल्यास विकास शक्य असल्याचे प्रतिपादन समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महिला प्रदेशाध्यक्ष माया मोहूर्ले यांनी केले.
तालुक्यातील मंजेगाव येथे सोमवारी ११ मार्च रोजी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबोधन मेळाव्याप्रसंगी उद्घघाटक म्हणून माया मोहूर्ले बोलत होते.यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक किशोर नगराडे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घघाटक सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहूर्ले , महिला प्रदेश अध्यक्ष मायाताई मोहूर्ले , सह उद्घघाटक राजेश कलगटीवार , माजी सरपंच बबन गोरंतवार , रुपेश वालकोंडे , विजय देवतळे स्वागताध्यक्ष धम्मराव दुर्गमवार संजय गोरडवार ,
विषेश अतिथी
दुशीला दुर्गमवार , गंगाधर रामटेके , माजी सरपंच, शौर्य मोहुलें, परमेश्वर मोहुलें ,वैशाली मोहुलें, ईश्वर मोहुलें प्रकाश मोहुलें , गजू आलेवार , अनिल बोटकावार ,प्रमोद रामटेके, बिच्छू चोपदंडीवार, मनोज रामटेके, जयश्री रामटेके गोकुळदास मोहुलें, देवीदास धुपजारे ,दिपक आरिकार . परशुराम बोलीवार, भावना बोलीवार, कमलेश कोरेवार. आदी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान
समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले
समाज भुषण पुरस्कार प्राप्त करते
दिवंगत दिपक पुरुषोत्तम बोलीवार यांच्या पत्नी अश्विनी दीपक बोलीवार
समाज भुषण पुरस्कार प्राप्त
अनिल बोटकावार यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना मोहूर्ले म्हणाल्या आज केवळ समाज विकासाची धुरा पुरुषांवर सोपवून चालणार नाही त्यासाठी समाजातील शिक्षित महिला या सामाजिक चळवळीमध्ये सहभाग होऊन महिला शक्ती एकवटन्यासाठी सर्व महिलांनी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
रूपेश वालकोंडे यांनी केले तर
संचालन किशोर नरुले यांनी केले तर आभार
धम्मराव दुर्गमवार यांनी मानले.
कार्यक्रमाला चामोर्शी तालुक्यातील व गडचिरोली जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.