ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

मी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकरी कुटुंबाचा सन्मान हेच माझे ध्येय – आमदार प्रतिभा धानोरकर

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

 

सध्या देशासह राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून शासनाची शेतकरी विरोधी धोरणे व असमानी संकट, शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसदारांना धनादेशाचे वाटप आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते बचत भवन तहसिल कार्यालय वरोरा येथे करण्यात आले.

 

घराचा कर्ता पुरुश गेल्याने त्या कुटुंबाची अवस्था काय होते याची जाणीव मला असून मी स्वतः शेतकरी कुटुंबातील मुलगी असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची मला जाण आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी धनादेश वितरण कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा मुळे वरोरा तालुक्यातील आजनगांव, बोर्डा, माढेळी, सोईट, शेगांव बु., खांबाडा, चारगांव खु., शेंबळ, तुमगांव गावातील काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 1 लक्ष धनोदेशाचे वाटप तहसिल कार्यालय वरोरा येथे दि. 13/03/2024 रोजी करण्यात आले. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून तो जगला तर आपण जगू आणि त्याला जगवण्याची जबाबदारी आमची देखील असेल, तसेच त्याला सन्मानाची वागणूक देखील मिळावी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी देखील भविश्यात माझा लढा राहील असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

 

या प्रसंगी कोटकर साहेब तहसीलदार वरोरा, श्री. काळे साहेब नायब तहसिलदार वरोरा तसेच राजु चिकटे माजी सभापती तथा संचालक कृ.उ.बा. वरोरा यांच्यसह शेतकरी कुटुंबातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.