ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नारायण राणें च्या विरोधात सिंधुदुर्गात मनोज काळसेकर रिंगणात..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

मुंबई – ( इंडिया 24 न्यूज ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर नारायण राणे भाजपा तर्फे लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज काळसेकर यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
सिंधुदुर्ग रत्नागिरी विकास आराखडा मनोज काळसेकर यांनी आखला असुन दूबई सिंगापूर च्या धर्तीवर कोकणाचा विकास करण्यासाठी कोकणवासीयांनी मला साथ अशी हाक मनोज काळसेकर यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांना आज सगळेच राजकारणी विसरले आहेत.
कोकणचं वैभव ही कोकणची माणसं आहेत. कोकण च्या या रत्नांना राणेंनी फक्त चाकरमानी बनवून ठेवले आहेत. मुंबई चालवणारा कोकण भूमिपुत्र हा अरामको सारख्या कंपन्यांची चाकरी करणार नाही तर कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर राज्य करेल हे मी करुन दाखवणार असा विश्वास राष्ट्रीय समाजवादी पार्टी तर्फे लोकसभा उमेदवार मनोज काळसेकर यांनी व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.