ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️डेमोक्रॅटिक रिपाई च्या डॉ. राजन माकणीकर यांचे महामहीम राष्ट्रपतींना पत्र “कोश्यारी हटावं ” प्रकरणी लवकरच राष्ट्रपती भवनावर उपोषण..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

मुंबई दि ( इंडिया 24 न्यूज ) : राज्याचे विद्यमान राज्यपालं कोश्यारी सतत समाज विघातक कृत्य करत असून संविधानिक पदाचे पावित्रे राखत नसल्यामुळे भगत कोश्यारी हटावंन्यासाठी लवकरच महामाहीम राष्ट्रपती भवनावर उपोषण करण्याचा इशारा डेमोक्रॅटिक रिपाईच्या डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

डेमोक्रॅटिक रिपाई पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, विद्रोही पत्रकार पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक संघटनेचे संस्थापक महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना इमेल द्वारे पत्र लिहून विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालं पदाहून हटावण्याची विनंती केली आहे.

डॉ. माकणीकर असेही म्हणाले की, संविधानिक पदावर राहून मा. भगत सिंह कोश्यारी संविधानाचे पावित्रे राखत नाहीत, बहुजन महानायक व नायिकांचा ते उघड उघड अपमान करतात, मराठी भाषिकांना कमी लेखून त्यांच्यावरच शिर्जोरी करतात सर्वभौमत्व ऐवजी हिंदुत्व पुरस्कृत राजकारण करतात हे राज्याच्या ऐकता व अखंडतेला मारक आहे.

मविआ च्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या शपथ विधी समयी त्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब् आंबेडकरांचे नाव घेत होत्या तर त्यांना रोखण्यात आले, मात्र: विद्यमान मुख्यमंत्री शपथविधी समयी दिवंगत बालसाहेब ठाकरे व धर्मवीर दिघे साहेबांचा उल्लेख केला त्यांना विरोध न करता त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली शिवाय् सावित्री आई व क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अपशब्द बोलून त्यांच्यावर विनोद केला.

राज्यपाल भगत कोस्यारी यांना पुढे पदावर कायम ठेवले तर नक्कीच राज्यात जातीय भावनांचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल व समाजिक समतोल ढसाळला जाईल त्यामुळे लवकरात लवकर कोस्यारी यांना हटवण्यात यावे अन्यथा रिपाई डेमोक्रॅटिक व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा च्या पॅन्थर वतीने राष्ट्रपती भवनावर उपोषण करण्यात येईल असा इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.