ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शहीद अभिवादन व समर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

अकोला.-( इंडिया 24न्यूज ) :
देशासाठी शहीद झालेल्या हुतात्मा,जवान,किसान व ज्ञात-अज्ञात विरांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद स्मृती दिनाच्या औचित्याने एकदिवसीय उपवास अण्णत्याग व जागर दि.२३ मार्च 2024 शनिवारी आयोजन करण्यात आले आहे.
संत वासुदेव महाराज भूमिपुञ अभियान सभागृहात दर्यापूर रोड सिरसो येथे हा कार्यक्रम होईल.सकाळी १० वाजता जेष्ठ समाजसेवक गजानन हरणे अकोला यांच्या उपस्थितीमध्ये शहीद स्मृतीस वंदन करण्यात येईल.तदनंतर वं.रा.तुकडोजी महाराज गुरूदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष
बबनराव देशमुख,उत्तमराव पिंजरकर,गोवर्धन पाथरे,दादारावजी ढोक,निळकंठ गि-हे व संच राष्ट्रीय भजन सादर करून जागर करतील.
दुपारच्या सञासाठी मार्गदर्शक म्हणून तहसीलदार शिल्पा बोबडे तथा ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष भगत, मनोहर वानखडे शहर पोलीस स्टेशन आदी मान्यवर उपस्थित राहतील.यावेळी विदर्भ स्तरावरील समर्पण पुरस्कार वितरण व राष्ट्रीय खेळाडूंना सन्मानीत करण्यात येईल.सामूहिक अभिवादनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जयदीप सोनखासकर संयोजक श्री संत वासुदेव महाराज भूमिपुत्र अभियान,शरद गणोरकर,रोहन शेळके,संतोष राऊत,सुधाकर सातरोटे, नंदकिशोर गावंडे. आदिनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.