ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

 

धनराज सरपाते: सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: ( इंडिया २४ न्युज) दिनांक ६/५/२०२४
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील वनकर्मचाऱ्यानी सकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान आत्महत्या केली . श्री महादेव मेश्राम वय ५४ वर्षे असे वनकर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, श्री महादेव मेश्राम हे वनविभागात वनकर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना पोटाचे विकार दहा पंधरा वर्षांपासून होते त्यामुळे त्यांच्या पोटाचे दोन तीनदा ऑपरेशनही झालेले होते. आजारी असताना सुद्धा कामावर जात होते. त्यातूनच नैराश्य आल्यानं मानसीक व शारीरिक आजाराला कंटाळून वनविभागाच्या कुटीमध्ये लोखंडी रॉडला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशनला मिळताच सिंदेवाही पोलीसांनी व वनकर्मचाऱ्यानी घटनास्थळ गाठून ,पो. का.आत्राम साहेब, बावणे साहेब, जांभुळे साहेब यांनी पंचासमक्ष पंचनामा करून, उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही येथील रूग्णालयात, वनविभागाच्या वाहनाने पाठविण्यात आले. पंचनामा करतेवेळी श्री हटवादे पो.पा. श्री गडपायले क्षे.सा.व वनकर्मचारी वृंद उपस्थित होते. मृताचे पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.