ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️माढा लोकसभेसाठी समाजवादी पार्टी तर्फे तुकाराम खांडेकर रिंगणात..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

माढा – ( इंडिया 24 न्यूज ) : मा.श्री तुकारामभैय्या उर्फ सुरजभैय्या खांडेकर युवा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांना माढा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नॅशनल सोशालिस्ट पक्ष कडून (समाजवादी पक्ष) माढा मतदार संघात चर्चेत असलेल्या मतदार संघात नॅशनल सोशालिस्ट पक्षाकडून लोकसभेची ऑफर युवा नेते तुकारामभैय्या खांडेकर हे महाराष्ट्रातील एकमेव युवा पिढीतील असे नेते आहेत की सामाजिक कार्याची आवड असणारे आणि गरिब शेतकरी कुटुंबातील युवक असून राजकिय क्षेञापेक्षा सामाजिक कार्यात सहभाग घेणारे नेते आहेत.
कोरोना काळात गरिब कुटुंबातील लोकांना फळे,अत्यावश्यक वस्तू वाटप अनाथ आश्रम मध्ये जाऊन विचारपूस करणारे नेते आहेत. दुसर्‍याच्या सुखादुखात सामिल होऊन आधार देणारे युवक आहे आणि मुलांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजू लोकांना विविध योजनेचा लाभ घेऊन देणे तसेच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा युवक असून रस्ते,पाणी,अत्यावश्यक,हाॅस्पिटल बिल या संदर्भात एक हात मदतीचा हा उपक्रम राबविणे असे विविध उपक्रम राबवत असतात.
तसेच युवकांवर होणारे अन्याय अत्याचार तसेच सर्व मुलांना आपल्या भावाचा असरा देणारे नेते आहेत.तसेच शैक्षणिक क्षेत्रातील युवकांच्या अडचणी ,घरकुल संदर्भात अडचणीचा ते पाठ पुरवठा करतात.
माढ्यात जर सक्षम उमेदवार हवा असेल तर समाजवादी पार्टीकडून ऑफर असणारे तुकारामभैय्या खांडेकर यांच्या पाठीशी उभा राहून बदल घडवावा तुकारामभैय्या खांडेकर सर्व सामान्य घरातील शेतकरी पुञ आहे,अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा हव्या असतील तर जनतेने साथ द्या.हा युवक जर मंञालयात पाठविला तर युवकांच्या रोजगार तसेच शेतकऱ्यांच्या मालासाठी तसेच माझ्या ताईच्या रक्षणासाठी लढेल आणि दुध दर ,भाज्यापाल्याना दर वाढ तसेच इतर सोयी सुविधा साठी लढेल आणि माझ्या सर्व समाजातील प्रत्येक गावात तसेच शहरातील समस्यांवर लढेल.माढ्यात तुकारामभैय्या पाहिजे असेल तर तुकारामभैय्या खांडेकर यांच्या पाठीशी उभे राहून सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पक्षानी तसेच संघटनांनी मदत करावी असे आवाहन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.