ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️केजरीवाल यांच्या चांगला आरोग्यासाठी “AAP” तर्फे सामुहिक उपवास व भजन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

भद्रावती – ( इंडिया 24 न्यूज ) : रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तानाशाही पध्दतीने अटक करण्यात आली. अटकेत असतांना त्यांचे आरोग्य ढासळत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व त्यांची लवकर सुटका व्हावी तसेच देशातील तानाशाही व्यवस्थेला सुबुद्धी लाभावी याकरिता शहरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकारणीने बस स्थानकासमोरिल इंडिया आघाडीच्या पेंडालमध्ये सामुहिक उपवास आयोजित केले. या कार्यक्रमात पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी रोजा ठेवला, तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक उपवास ठेऊन केजरीवाल यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यासह याठिकाणी भजन गाऊन प्रार्थना करण्यात आली. यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर संघठन मंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, युवा अध्यक्ष सागर कांबळे, गणेश अकोले, पप्पू श्रीवास्तव, बेबीताई बुरडकर, रेखा भोगे, मीनाक्षी अकोले व इत्यादी पदाधिकारी तसेच आप व इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.