ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मावळ लोकसभा मतदारसंघातून नोटा बहूमताने दाबला जाण्याचे संकेत..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

मुंबई – ( इंडिया 24 न्यूज ) : राष्ट्रीय समाजवादी पार्टी चा समाजवादी विचारांचा पाईक मावळ लोकसभा मतदारसंघातून कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संस्थापक अमृताताई भंडारी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी पन्नास हजार रुपयेची आलेली ऑफर धूडकावून लावत लोकसभा निवडणूक लढवली.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ जयश्री मारणे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदार संघ समन्वयक सौ अंजली कांबळे, पिंपरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक सौ मलिका शेख, मावळ विधानसभा मतदारसंघ समन्वयक महेंद्र शेलार, कर्जत खोपोली खालापूर विधानसभा समन्वयक श्री खेरणेकर, उरण विधानसभा समन्वयक पेण पनवेल भास्कर पाटील यांनी विधानसभेत जो समाजवादी विचारधारेच्या अजेंड्याला साथ देईल त्यालाच समाजवादी मतदार साथ देतील अन्यथा नोटा बहूमताने थांबतील अशी भूमिका अमृता भंडारी यांनी घोषित केली आहे.
2023 या वर्षात अमृता भंडारी यांनी खालापूर तालुक्यातील दिंडी सोबत पंढरपूर वारी केली.
सोबतच 2024 मार्च एप्रिल मध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. घाटाखाली आणि घाटावर दोन्ही प्रकारच्या जनमानसात लोकांच्याआवडी निवडी, धार्मिक कार्यक्रम, भौगोलिक परिस्थिती, विकासाची गरज आणि संधी यांचा अभ्यास केला, आय आर बी ने संपुर्ण मावळ लोकसभा क्षेत्रात निर्माण केलेली दहशत, जनरल मोटर्स कामगार साखळी उपोषण आंदोलन, स्थानिक तरूणांवर अन्याय खासदार म्हणून आमदार खासदार म्हणून काम करताना फक्त गटार आणि रस्ते यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वैभव निर्माण करणारा नेता हवा.
सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना समाजवादी पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे मात्र मावळ मधुन दगड निवडून देण्याची प्रथा बंद करणार असल्याचे जाहीर करून आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना झुगारून देऊन पाट्या टाकणारे नेते ही परंपरा मोडीत काढून विकासाचा चेहरा होण्याची खरी क्षमता असणारा उमेदवार अजून तरी दृष्टीपथात नाही योग्य वेळी निर्णय घेऊ अन्यथा नोटाला बहूमताने निवडून देऊ अशी भूमिका समाजवादी पक्षातर्फे संस्थापक अमृताताई भंडारी, राष्ट्रीय अध्यक्ष कोकण भूमी पुत्र मनोज काळसेकर, राष्ट्रीय अध्यक्ष सलीम शेख, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र पंडित, राष्ट्रीय महासचिव लक्ष्मण चांदेरे, राष्ट्रीय प्रवक्ते पियुष पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप हराळे,
महाराष्ट्र प्रदेश महासचिव अधिकराव जगताप, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सनी पवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख हेमंत केळकर, प्रदेश प्रवक्ते तुळशीराम जांभूळकर, महाराष्ट्र प्रदेश बांधकाम सेल अध्यक्ष शरणप्पा हळीझोळ, भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष यशवंतराव शेळके, चित्रपट कामगार महासंघ प्रदेशाध्यक्ष भूषण घोलप, उपाध्यक्ष तन्मय सरवणकर, महासचिव अजित पवार, दिव्यांग सेल प्रदेशाध्यक्ष प्रकाश भारती, तृतीय पंथी आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा कदम, सहकार सेल प्रदेशाध्यक्ष सुखदेव वाघमारे, हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात राबवण्याची घोषणा केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.