ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

संगिता कुंभारे शिक्षिका व किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी यांच्या कटकारस्थानाने येरगाव शाळेतील विद्यार्थी परिक्षे पासून वंचित!

परिक्षा नाही तर पुढील शिक्षणापासून विद्यार्थी मुकणार का? की पास होणार! शाळा व्यवस्थापन समिती येरगाव अध्यक्ष सुभाषचंद्र महादेव विजकापे यांची मागणी

 

 

धनराज सरपाते:सिंदेवाहीतालुका प्रतिनिधी

सिंदेवाही:( इंडिया २४ न्युज) दिनांक ३०/४/२०२४
पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगाव येथील विद्यार्थी परिक्षा पासून वंचित आहेत, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कोणत्याही बालकाला शिक्षणापासून व परिक्षा पासून वंचित ठेवणे, हा कायदेशीर गुन्हा ठरतो.सदर अधिनियम कलम ८,९ व १६ चे उल्लंघन होणार नाही यांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना, संबंधिताने त्यांचे उल्लंघन केले आहे .८६ व्या विशोधन अधिनियमान्वये
अनुच्छेद २१अ नुसार बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करणं बंधनकारक असताना, किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई वरिष्ठांनी दखल घेऊन केली नाही.
शिक्षिका यांच्यावर बाल हक्क संरक्षण अधिकार अधिनियम 2015 कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर व विद्यार्थीनी व शालेय पोषण आहार मदतनीस यांच्याशी मानवी हक्कांची पायमल्ली करून, वागणूक दिल्याने तक्रार करून, न्याय मिळाला नाही.

किशोर पिसे यांनी जर शिक्षिकेचा आदेश विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या तोंडी सुचनेनुसार रद्द केला नसता तर गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून अधिकांश विद्यार्थी वार्षिक परीक्षेपासून मुकले नसते.आज येरगाव येथील शाळेत ४३ विद्यार्थी असून ८-९ विद्यार्थी यांनीच वार्षिक परीक्षा दिली आहे.अजूनही शाळेला प्रभारसर मुख्याध्यापक नाही.किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी कुलूप तोडून प्रभार देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यार्थी शैक्षणिक नुकसानीस किशोर पिसे जबाबदार असल्याने
शिस्तभंग कारवाईस कायदेशीर जबाबदार ठरतात.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आहे.समिती पदाधिकारी यांना अधिनियमानुसार आपली कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक करण्यात आली आहे.
नियमबाह्य पद्धतीने अध्यक्ष निवड निवड करणं, अध्यक्ष यांच्या गैरहजेरीत शालेय कपाट
फोडून,संरक्षण व लबाडीचा गैरप्रकार करण्यासाठी किशोर पिसे यांनी अधिकाराचा सैरपणे गैरवापर वापर करून, शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते.

शालेय स्तरावर घडलेल्या घटनांबद्दल वरिष्ठांना माहिती कळवून सुद्धा बघ्याची भूमिका घेतली जात असेल तर संबंधित व्यक्ती वर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

येरगाव शाळेत संगिता कुंभारे शिक्षिकेने जाणीवपूर्वक शुल्लक कारणासाठी केलेली मानवी हक्कांची पायमल्ली व अक्ट्रासिटी अक्ट विविध कलमांचे उल्लंघन करणे अशी गंभीर स्वरूपाची बाब असताना किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी यांनी सुरुवातीला दुर्लक्ष करून प्रकरण वाढविण्यासाठी लबाडीने वागून , स्वतःच्या स्वार्थासाठी अधिकाराचा वापर करून , विद्यार्थ्यांचं कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान केल्याने, किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती येरगाव अध्यक्ष सुभाषचंद्र महादेव विजकापे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.