ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शहीद हेमंत करकरे यांच्या बलिदानावर वादग्रस्त विधान करणाऱे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचा जाहीर निषेध!*

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

*चंद्रपुर:- महाराष्ट्र पोलिस विभागातील ATS चे मुख्य पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्या 26/11 च्या शहीद बलिदानावर शंका घेत त्यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हे, तर पोलिस अधिकान्यांच्या बंदुकातीलच होती, असे वादग्रस्त विधान विरोधी पक्षनेते काँग्रेसचे श्री विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक मा. किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार व मा. किशोरजी राय संपर्क प्रमुख यांचे मार्गदर्शनात चंद्रपुर शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितीन मते तसेच चंद्रपुर महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर व चंद्रपुर महानगर प्रमुख भरत गुप्ता यांचे नेतृत्वात आज दि. ०८ मे २०२४ रोज मंगळवारला सकाळी ११.०० वा. शहीद हेमंत करकरे चौक, बाबुपेठ पोलीस चौक समोर “जाहीर निषेध” करण्यात आला.*

*सदर निषेधाच्या वेळी शिवसेना पक्षाचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिन मत्ते, जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकुर, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, चंद्रपुर महानगर प्रमुख भरत गुप्ता, वैद्यकीय जिल्हाप्रमुख दिपक कामतवार, बल्लारपुर शहर प्रमुख श्रेयांश ठाकुर, वरोरा शहर प्रमुख राजू डांगे, महिला आघाडी उप जिल्हाप्रमुख मायाताई मेश्राम, महिला आघाडी शहर प्रमुख वाणी सदालावार, सुनीता गोवर्धन, मंदा करहाले, राकेश बहुरीया, नयन जंगम, आदित्य यादव, राजू ऐटलावार आदी शिवसैनिकांची उपस्थित होती.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.