ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️25 वा लग्नाचा वाढदिवस…

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

पनवेल – ( इंडिया 24 न्यूज ) : गिरजा वेल्फेअर असोसिएशनचे अनाथ मुलांसाठी गिरिजा बालगृह हे खारघर येथे वसतीगृह आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री वसंत गंगय्या कुंजार असून रोशन पाटील, सुनंदा सपलींग, गणेश सपलींग,अनंत पाटील व मधुकर म्हात्रे हे सभासद आहेत. श्रीराज म्हात्रे हे तेथील व्यवस्था पाहतात.या संस्थेत 30 अनाथ मुलं असून संस्थेतर्फे त्यांची राहण्याची जेवणाची व शिक्षणाची उत्तम सोय केलेली आहे. पनवेलचे अभिनेता श्री रत्नकांत म्हात्रे व त्यांची पत्नी सौ आशा म्हात्रे यांनी 9 मे रोजी आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस मुलांना जेवण देऊन मोठ्या उत्साहात साजरा केला. मुला मुलींचे वस्तीगृह, वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा ठिकाणी भेट देऊन तेथे आपले वाढदिवस आवर्जून साजरे करावेत . त्यांना आपल्यापरीने वस्तू कपडे या स्वरूपात मदत करावी व त्यांच्या सानिध्यात आपला दिवस सत्कारणी लावावा असे आवाहन अभिनेता रत्नकांत यांनी केले. आपल्या संस्थेला आवर्जून भेट दिली त्याबद्दल अध्यक्ष श्री वसंत कुंजार यांनी दोघांचे उभयतांचे आभार मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.