ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आंबेडकरी समाजवादी चळवळीतील राजकीय चेहरा मनोज काळसेकर

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

मुंबई 🙁 इंडिया 24 न्यूज ) : लोकांनी लोकांसाठी चालवलेला लोकांचा पक्ष राष्ट्रीय समाजवादी पार्टी भारतीय समाजवादी संविधान वाचवण्यासाठी धर्मांध झुंडशाही चा बिमोड करण्यासाठी, तत्वांचा बाजार मांडून भ्रष्टाचारी नेत्यांची चांडाळ चौकडी महाराष्ट्र उध्वस्त करते आहे, जनसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नसणारे सत्तेचे लोभी केवळ राजकारण करून मतांचा जोगवा मागत आहेत.
आणि माझी बहुजन जनता ज्यात ओबीसी एससी एसटी व्हीजे एनटी आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे. आरक्षण विरोधकांना संविधान बदलायचय बहुजनांना गुलाम बनविण्यासाठी पात्रतेचे निकष लावताना हे विसरले पाच हजार वर्षे आम्ही भोगलेल्या यातना.
आमच्या बापाने लिहिलेल्या संविधानात यांना आमच्या पेक्षा जास्त दिलं. इतकं मोठं मन आणि इतका मोठा माणूस इतक्या यातना भोगुनही समता बंधुता न्याय तत्व आणि संविधानात वेळोवेळी बदल करण्याची तरतूद आणि आम्हाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. पाच हजार वर्षे यातना भोगल्या नंतर कुठे ही बदल्याची भावना नाही. या गडद अंधारात आम्हाला फक्त एक आरक्षणाची काठी दिली तोल सावरायला आणि तीही हिसकावुन घेण्याची संघाची मानसिकता.
आम्हाला ही मानसिकता ठेचून काढायची आहे. कारण देशाची सर्वोच्च पद जरी आमचा ओबीसी एससी एसटी समाज भोगत असला तरी गुलामगिरी च्या मानसिकतेत जगणारा आमचा समाज जो पर्यंत शंभर टक्के बहुजन राष्ट्र ही संकल्पना राबवत नाही तोपर्यंत आमची सुटका नाही. राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यासाठी ही या एकविसाव्या शतकात भारतीय संविधानाच्या राष्ट्रीय एकात्मता समता बंधुता न्यायाच्या रचनेत आमच्या समाजाच्या व्यक्तीला ती केवळ त्यांच्या सनातनी मानसिकते नुसार शुद्र ठरवून शुद्धीकरण करून घ्यायला भाग पाडले जातं असेल तर युरेशियन ब्राह्मण मानसिकतेला सदेह भारतीय द्विपकल्पातुन बाहेर काढावे लागेल.
आरपीआय असो वा बसपा त्यांच्याशी साटंलोटं करून आपल्या समाजाला गुलामीच्या साखळदंडात जखडणार असेल तर सोडा त्या नेत्यांना आणि बहुजन समाजवादी सरकार स्थापन करण्यासाठी भारत आघाडीत एकत्र या.
राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज काळसेकर यांनी संपूर्ण मराठा, धनगर, माळी, वंजारी, ओबीसी एससी एसटी व्हीजे एनटी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.