ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मान्सुनपुर्व नाले स्वच्छता मोहीमेची पाहणी कामाला वेग देण्याचे उपायुक्तांचे निर्देश..

 

श्री. राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : १४ मे – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन सदर मोहीमेची उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान उपायुक्तांनी स्वच्छता कामगारांना वेळेत काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच वेळप्रसंगी अतिरिक्त मशीन लावुन काम पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे मे महिन्यापासुन सुरु करण्यात आलेली आहेत. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सफाई मोहिम सुरु असुन १२० सफाई कर्मचारी, ३ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ६ ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.
नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असुन याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.