ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतदारांच्या मदतीसाठी विविध सुविधा उपलब्ध : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

धुळे, दिनांक 18 मे, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दि. 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे किंवा कसे, तसेच ज्याठिकाणी मतदान करावयाचे आहे अशा मतदान केंद्राचा पत्ता व अन्य नोंदणी उपलब्ध करुन घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार मतदारांच्या तक्रारी व मदतीकरिता ऑनलाईन पोर्टल सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
अशा आहेत डिजीटल सुविधा
*भारत निवडणूक आयोगाचे मतदार पोर्टल (https://voters.eci.gov.in/) :* मतदार आपले नाव मतदार यादीत शोधताना या पोर्टलमध्ये राज्याचे नाव, मतदाराचे पहिले नाव, नातेवाईकाचे पहिले नाव, वय किंवा जन्मतारिख व लिंग या अनिवार्य तपशिलाची योग्य त्या रकान्यामध्ये नोंद करुन आपले नाव व तपशील शोधू शकतात. मतदार ओळखपत्राच्या दहा अंकी क्रमांकाच्या आधारे किंवा मतदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे (सदर मोबाईल क्रमांक संबंधित मतदार माहिती सोबत पूर्वीच जोडलेला असेल तर) आपले नाव आणि मतदान केंद्र व क्रमांक शोधण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
*व्होटर हेल्पलाईन ॲप :* हे अॅप मतदार आपल्या मोबाईलवर डाउनलोड करुन त्यामध्ये ‘Search your Name in Electoral Roll’ या पर्यायामध्ये क्लिक करुन त्यामध्ये उपलब्ध होणा-या चार उप पर्यायांच्या आधारे आपले नाव व मतदान केंद्र याबाबतचा तपशील शोधू शकतात. त्यामध्ये आपल्या मतदार तपशीलाशी आधीच जोडलेल्या मोबाईल क्रमांक नमूद करुन त्या आधारे तपशील शोधता येईल किंवा पोर्टलमध्ये मतदाराचे पहिले व मधले नाव, नातेवाईकाचे पहिले नाव, वय, राज्याचे नाव व जिल्हा इ. अनिवार्य तपशील नोंदवून सुध्दा आपले नाव व अन्य तपशील शोधता येईल. त्या व्यतिरिक्त आपल्या 10 अंकी मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे सुध्दा आपले नाव, मतदान केंद्र व अन्य तपशील शोधता येईल. त्याचप्रमाणे नविन मतदार ओळखपत्रावर क्यू आर कोड नमूद आहे. सदर क्यू आर कोडच्या आधारेही हा तपशील उपलब्ध होऊ शकेल.
जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी यांचे नियंत्रण कक्ष तसेच संपर्क क्रमांक 1950 येथे संपर्क करणे. याप्रमाणे जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदान नोंदणी अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 9322765848 किंवा 1950 या संपर्क क्रमांकाशी संपर्क करताना संबंधित मतदारांनी त्यांनी यापूर्वीच्या निवडणूकामध्ये ज्या ठिकाणी मतदान केले होते किंवा सध्याचा निवासाचा पत्ता हा तपशील सांगितल्यास वरील नियंत्रण कक्षातील कर्मचारी त्यांच्या मतदार यादीतील नाव व तपशीला संदर्भात अधिकची माहिती देऊ शकतात.
*शेजा-यांची मदत घेणे:* मतदाराला आपले मतदान केंद्र माहित नसल्यास ते आपल्या शेजा-यांशी संपर्क करुन मतदान केंद्राचा पत्ता मिळवू शकतात व त्या माहितीच्या आधारे जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी यांच्या नियंत्रण कक्ष क्रमांक 9322765848 किंवा 1950 या संपर्क क्रमांकावर संपर्क करुन आपले मतदार यादीतील नाव व अन्य तपशिल याबाबतची माहिती घेऊ शकतात.
तरी नागरिकांनी त्यांच्या मतदार यादी संदर्भातील, आचारसंहिता व अन्य निवडणूक विषयक तक्रारींसाठी वरील क्रमांकांवर संपर्क करावा. असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.