ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️खोलीकरण व नदी पात्र स्वच्छता मोहिम तात्काळ हाती घ्या – आ. किशोर जोरगेवार

▪️जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत केली मागणी..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) वेकोली आणि सिएटीपीएसच्या मातीच्या व राखेच्या ढिगा-यांमुळे इरई नदी प्रदूषित होत आहे. परिणामी पाण्याच्या प्रवाहात अडथडा निर्माण होत असुन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता बढावली आहे. ही बाब लक्षात घेता नदी खोलीकरण व नदी पात्र स्वच्छता मोहिम तात्काळ हाती घेत वेकोलि व सीएसटीपीएस या कंपन्याच्या माध्यमातून इरई नदीचे बुजलेले पात्र खोलीकरण करून पात्रातील झाडेझुडपे साफ करण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिल्या आहे.

आज सोमवारी मतदार संघातील विविध विषयांना घेउन आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली यावेळी विकासकामांसदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहे.

वेकोलि व सीएसटीपीएस या कंपन्याच्या मातीचे व राखेचे ढिगारे पावसाळ्या पाण्याने वाहत इरई नदीतील पात्रात जमा होत आहे. त्यामुळे नदीचे पात्र आणि नदीला जोडलेले ओढे बुजले आहेत. यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून आसपासच्या भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. याचबरोबर या बुजलेल्या पात्रामुळे पाण्यातून होणारा गाळ आणि झाडेझुडपेही नदीपात्रात जमा होत आहे. परिणामी पाण्याची गुणवत्ता खराब होत असून शेतीसाठी पाण्याचा पुरवठाही प्रभावित होत आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, इरई नदी आणि इतर बुजलेल्या ओढ्यांचे खोलीकरण करण्यात यावे. यासाठी वेकोलि आणि सीएसटीपीएस यांच्या माध्यमातून इरई नदीच्या पात्रातील झाडेझुडपे साफ करणे आवश्यक आहे. या उपाययोजनांमुळे पाण्याचा प्रवाह सुलभ होईल, पूर येण्याचा धोका कमी होईल आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर व सभोवतालच्या परिसरात नेहमी उद्भवणार्या पुरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेकोलि आणि सीएसटीपीएस यांच्या माध्यमातून इरई नदीचे बुजलेले पात्र खोलीकरण करून पात्रातील झाडेझुडपे साफ करण्याची मोहिम तात्काळ हाती घेण्यात यावी अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.