ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रेल्वेच्या धडकेत तीन चितळ ठार, तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील गोंदिया – बल्लारशा ट्रॅक वरील घटना..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

नागभिड – ( इंडिया 24 न्यूज ) : ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी मधील तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी, नीयतक्षेत्र, गंगासागर हेटी बिट, कक्ष क्रमांक 90 मध्ये बल्लारशा गोंदिया रेल्वे ट्रॅक लगत रेल्वेच्या धडकेमध्ये तीन चितळ्यांचे मृत्यू झाल्याची घटना रात्री उघडकीस आली. नागभीड कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेमध्ये ही घटना घडल्याची ,रात्री 10 वाजता घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तथा तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी स्वाब संस्थेचे सदस्य घटना स्थळी जाऊन मोक्का पंचनामा करून रात्री दोन वाजता तिन्ही मृत चितळांना वनविभागाच्या सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणून आज सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यापैकी एक दीड ते दोन वर्षे वयाचा तर दोन चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून त्यापैकी एक मादा चितळ हे गर्भावस्थेत असल्याचे आढळून आले.

हे शव विच्छेदन डॉ. यांनी केले, यावेळी तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कंन्नमवार , तळोधी चे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाळ,
स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, जिवेश सयाम सदस्य सर्पमित्र, व इतर सदस्य उपस्थित होते.
*”विशेष म्हणजे गोंदिया – बल्लारशाह रेल्वे लाईन ही ताडोबा आणि ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलामधूननच गेलेली असल्यामुळे या रूटवर सतत वन्यजीव मृत पावल्याच्या घटना घडतात, यामध्ये चिचपल्ली- मुल- नागभीड- तळोधी – शिंदेवाही या परिसरामध्ये वाघ, अस्वल , बिबट ,आणि सांबर चितळ, नीलगाय, रानगवा, अशा पद्धतीचे वन्यजीव सतत मरत असतात त्यामुळे जंगलातून चालणाऱ्या रेल्वेची वेग मर्यादा ही कमी असावी. तसेच दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाळीचे कुंपण केलेले असावे जेणेकरून या प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही, सोबतच रेल्वे विभागावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यायला हवा जेणेकरून अशा दुर्दैवी घटना कमी करता येतील
प्रतिक्रिया..यश कायरकर , अध्यक्ष, ‘स्वाब नेचर केअर फाउंडेशन.’

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.