ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल “केसरीमल पालीवाल विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश पारशिवनी..

 

संपादक – सौ. शिल्पा बनपुरकर

नागपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 27 5 2024 विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या वळणाचा पहिला टप्पा म्हणजे एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल सर्वांनाच मोठी हुरहुर लागलेली असते. निकालात काय होईल? आज तो दिवस आला 27 मे. बोर्डाने परीक्षेचा निकाल ऑनलाईन दुपारी एक वाजता जाहीर केला, स्थानिक केसरीमल पालीवाल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. विद्यालयाचा निकाल 94% लागला, त्यात विद्यालयातून प्रथम कुमारी दीपिका विकास ढोबळे 93.40%, द्वितीय कुमारी दिव्यांनी जीवन कुंभलकर 91.60%, तृतीय कुमारी स्वाती अजय भगते 90.60%, कुमारी तनवी अनिल पालीवाल 88.80%, कुमारी लावण्या लक्ष्मीकांत सोनबरसे 87.60%, सम्यक अजय पाटील 87.40%, कुमारी सोनाली संजय चिखले 87.20% यांनी बाजी मारली. यावेळी संस्थेचे सचिव दीपक बाबू पालीवाल यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संचालिका पुष्पाताई पालीवाल, मुख्याध्यापिका सौ हिमांगी पोटभरे, उपमुख्याध्यापिका सौ चित्रा कहाते, पर्यवेक्षक दुधाराम शंभरकर , मनोज धोंगडे, लक्ष्मीकांत लोणारे, राजेंद्र बुटकुले, आरती पिसे, रितू पालीवाल, सौ अनिता जावळे, अशोक नगरे, अनिल बांबल, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.