ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

!! महामार्गावरील अतिक्रमण धारकावर धडक कारवाई !!

 

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज) दिनांक २८/५/२०२४
सिंदेवाही शहरातील मुल ते नागपूर मुख्य महामार्गावर व नवरगाव ते पाथरी मार्गावर अतिक्रमण धारकांनी कित्येक वर्षांपासून आपला व्यवसाय थाटून आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालवित असत परंतु रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करायचे असल्याने, नगरपंचायत,सा. बां. विभाग, पोलिस विभाग, पोलीस वाहतूक विभाग, महसूल विभाग,विद्यूत विभाग, यांच्या संयुक्त कारवाईने रस्त्यावरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात हटविण्यात आले, मागील काही दिवसांपुर्वी अतिक्रमण धारकांना स्व:ताहून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस सा. बां. विभागामार्फत बजावण्यात आली होती, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, यापुर्वीही अशाप्रकारे नोटीस बजावण्यात आली होती हे विशेष! त्यामुळे त्यांनी

फुटपाथवरील काही दूकाने तशीच उभी ठाकली होती, गेले दोन दिवसांपासून काही व्यवसायीकानी आप आपले सामानाची उचल करण्यास सुरुवात केली होती,आज दिनांक २८/५/२०२४/रोजी सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या पथकांनी, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय कडील रस्त्याचे कडेने थाटलेली दुकाने, दुकानासमोर बांधकाम केलेले रॅम्प तसेच पत्र्याचे छप्पर जेसीबी मशीनच्या साह्याने चकनाचुर केले, त्यामुळे जे काही अतिक्रमण धारक होते ते आप-आपले सामान काढण्यास सुरुवात केली,आज दिवसभर अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच होती, कारवाई करतेवेळी अतिक्रमण निर्मूलन पथक पुर्णवेळ उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.