ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 4 जून रोजी मुलाखतीचे आयोजन..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे दिनांक 30 मे, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरील भरती होण्यासाठी पात्र उमेदवाराना कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 4 जून,2024 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी ले.कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट,2024 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 63 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात येते. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 4 जून,2024 रोजी सकाळी 11.00 वाजता शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन सीडीएस 63 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत संबंधित परिशिष्ट उपलब्ध होईल. कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन दोन प्रती सोबत आणावी.

सीडीएस प्रवेशासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 व्हॉट्सअप 9156073306 किंवा ईमेल training.pctcnashik@gmail.com वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.