ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️9 जून ला बल्लारपूर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन..

▪️निबंध स्पर्धा, चर्चासत्र, पर्यावरण प्रेमींचा सत्कार..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर- ( इंडिया 24 न्यूज ) : जागतिक पर्यावरण दिन 5 जून निमित्य दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर च्या वतीने 9 जून 2024 रोजी एकदंत सभागृह बल्लारपुर येथे विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण संमेलनाचे उदघाटक म्हणून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सुधाकरजी अडबाले सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यावरण समितीचे अध्यक्ष डी.के.आरिकर, कार्यक्रमाचे सहउदघाटक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार, विशेष अतिथी म्हणून चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, डॉ.रजनीताई हजारे माजी नगराध्यक्ष बल्लारपुर, हरीशजी शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपुर, घनश्यामजी मूलचंदानी माजी नगराध्यक्ष, संतोषसिंह रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक, संदीपजी गिर्हे जिल्हाध्यक्ष शिवसेना, ऍड.वैशाली टोंगे विचारवंत चंद्रपूर, डॉ.अभिलाषा गावतुरे भूमिपुत्र ब्रिगेड, गिरीश कुमरवार मुख्य अभियंता सिएसटीपीएस चंद्रपूर, तानाजी यादव प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उमाशंकर भादुले उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, प्रमुख अतिथी म्हणून ऍड.हिराचंद बोरकुटे, डॉ.बळवंत भोयर, विठ्ठलराव मासटवार, गुणेश्वर आरिकर, हरीश ससनकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.टी. डी.कोसे खत्री महाविद्यालय चंद्रपूर हे उपस्थित राहणार आहे.
सध्यस्थीतीत चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाने थैमान घातले आहे, जिल्ह्यात कोलमाईन्स, मोठं मोठे पवार प्लांट, कोलवाशरीज, पेपर मिल, राईस मिल, सिमेंट कारखाने, स्पंज आयरण कारखाने अश्या अनेक प्रकारच्या उद्योगामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासले असून हजारो एकर जमीन बंजर झाली आहे.
नागरिकांनी जगावे की मरावे अशी अवस्था झाली आहे परंतु शासन स्तरावर याची दखल घेतल्या जात नाही प्रदूषण नियंत्रण मंडळ असूनही प्रभावहीन ठरत आहे, वृक्षलागवड पाहिजे त्या प्रमाणात होतांना दिसत नाही तर दुसरीकडे असलेले जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावी आणि प्रदूषणाला आळा बसावा व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी यासाठी जनतेचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा होणार आहे. तसेच विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे विजेत्या प्रथम तीन विजेत्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे सोबतच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा पर्यावरण मित्र, पर्यावरण रत्न व पर्यावरण भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे यासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पर्यावरण प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे तसेच पर्यावरण विषयक निबंध, लेख व साहित्य पर्यावरण विशेषांकासाठी पाठवावे असे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष दलीतमित्र व आदिवासी सेवक डी.के.आरिकर, सचिव हरीश ससनकर, महिला अध्यक्ष स्वाती दुर्गमवार, बल्लारपुर तालुका अध्यक्ष सुधीर कोरडे, केशव थिपे, राजेश बट्टे, अतुल बांदुरकर, सचिन बरडे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.