ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️इतिहासातील अहिल्यादेवींचे पर्व अतिशय तेजस्वी – सुधीर थोरात यांचे प्रतिपादन..

▪️अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन थाटात..

 

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

चंद्रपूर ( इंडिया 24 न्यूज ) : 1 जून , पती, मुलगा, सासरे अशा अख्खा कुटुंबाचे निधन झाले. अवघ्या 28 व्या वर्षी वैधव्य आले. राज्याची, नव्हे राष्ट्र निर्माणाची धुरा खांद्यावर आली. तरीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कमालीच्या ताकदीने इतिहास रचला. अहिल्यादेवींचे पर्व अतिशय तेजस्वी ठरले. कारण या कालखंडात समाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय उत्क्रांती झाली. अहिल्यादेवींनी असे एकही क्षेत्र सोडले नाही, ज्यात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला नाही. त्यांचे जीवनच थक्क करणारे आहे. त्यामुळे या त्रिशताब्दी महोत्सवात त्यांचे जनतेपर्यंत जावे, अशी अपेक्षा शिवशंभू विचारमंचाचे संयोजक सुधीर थोरात यांनी येथे व्यक्त केली.
चंद्रपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रितशताब्दी जयंती समारोह नागरी समितीच्या वतीने येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात 31 मे रोजी सायंकाळी त्रिशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. तत्पूर्वी, येथील गांधी चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप आणि महोत्सवाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून सुधीर थोरात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे मार्गदर्शक तुषार देवपुजारी, तर उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रमुख अतिथी रती संदीप पोशट्टीवार, ज्योती दरेकर प्रभृती मंचावर उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, पतीच्या निधनानंतर खरे तर अहिल्यादेवी सती जाणार होत्या. पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना थांबवले आणि प्रजा हितासाठी राज्याचे शकट अहिल्यादेवींच्या समर्थ हाती दिले. पुढे त्यांनी अभूतपूर्व अशी कल्याणकारी कामे करून दाखवली. मंदिराचे पूनर्निमाण, धर्मस्थापना, भिल्ल समाजाचे उत्थान, कला, जलसंवर्धन, दळणवळण क्षेत्रातील त्यांची कामे वाखाणण्याजोगी आहेत. विशेष म्हणजे, राज्य कसे चालवायचे याचा जणू वस्तूपाठच त्यांनी घालवून दिला. त्याचवेळी त्यांचे वैयक्तिक जीवन अतिशय साधे, निर्मळ होते. त्या शिवभक्त होत्या. पण आज काही डाव्या विचारांची माणसं त्यांचे पिंडी हाती घेतलेले चित्र डावलून घोड्यावरचे चित्र पुढे करतात. त्यांच्यातून धर्म वेगळा करण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचे आहे, असेही थोरात म्हणाले.
देशभरात साजरी होत आहे त्रिशताब्दीः देवपुजारी
केवळ चंद्रपूर जिल्ह्यात नव्हे तर अवघ्या देशात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची त्रिशताब्दी जयंती साजरी केली जात आहे. यापूर्वी स्वामी विवेकांनद यांची सार्ध शती साजरी करण्यात आली होती. येत्या काळात अशा प्रभावशाली प्रभुतींचे महोत्सव साजरे करून जनतेपर्यंत आपला जाज्वल्य इतिहास पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे, असे तुषार देवपुजारी यांनी म्हटले.
प्रास्ताविकातून डॉ. मंगेश गुलवाडे यांनी, त्रिशताब्दी महोत्सव समितीची आणि येणार्‍या वर्षभरात होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. हे वर्ष सेवा वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून, येत्या 2 जून रोजी 300 जणांचे रक्तदान शिबीर आयोजित केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पर्वते यांनी, रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबले यांचा अ. भा. प्रतिनिधी सभेतील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावरील संदेश वाचून दाखवला. प्रारंभी महाराष्ट्र आणि अहिल्यागित झाले.
कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल गोंडे यांनी तर आभार कैलास उराडे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पोराटे, यशवंतराव कन्नमवार, सुभाष कासमगोट्टुवार, शीलाताई चव्हाण, अनिल फुलझले, अश्विनी खोब्रागडे,वंदना संतोष वार, मयूर भोकरे,प्रवीण गिलबिले, पवन ढवळे,प्रवीण उरकुडे,अनंता गोखरे,भानेश येग्गेवार,रमेश बुचे , प्रतिमा काळे,महादेव गराट,बंदिनी दरेकर, सुनील इखारे,सुरेखा मंदे,वामन मंदे,वासुदेव अस्कर, गणपत येवले,अपर्णा चिडे, संतोष दालन,विठ्ठल येवले,श्रीरंग दवंडे, सुषमा वैद्य,संकेत उगे यांनी अथक परिश्रम घेतले.

▪️बॉक्समधील मजकूर…

त्रिशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात युवक -युवतींना सहभागी करा
* विद्यापीठाचे सहकार्य असल्याची डॉ. प्रशांत बोकारे यांची ग्वाही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन विशेषतः युवक व युवतींना कळायला हवे. कारण त्यांचे नेतृत्व गुण घेऊन आजची ही पिढी पुढे सरसावल्यास या देशाचे कल्याण निश्चित आहे. इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थाचा इतिहास लिहिला. त्यामुळे अहिल्यादेवींसारख्या अत्यंत प्रभावशाली व्यक्तीमत्त्वाची ओळख तरूण पिढीला झाली नाही हे मोठे दुर्दैव आहे. गोंडवाना विद्यापीठ या महोत्सवात अपेक्षित सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाहीही डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.