आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

बाबूपेठ परिसरातील जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या बहुजन समता पर्वाच्या आयोजकांनी

*धनराज सरपाते* –

*सिंदेवाहि तालुका प्रतिनिधी*

चंद्रपूर : ०१ जून २०२४

चंद्रपूर : बाबूपेठसह शहरात नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्यामुळे बाबूपेठ स्थित बोधिसत्व विहारामध्ये माजी नगरसेवक श्री राजेश उके यांनी बाबूपेठ परिसरातिल समस्यांचे निवारण सामाजिक पातळीवरून करण्याच्या दृष्टीकोनातून आणि भेडसावनाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीकोनातून बहुजन समता पर्वाचे आयोजक डॉ.दिलीप कांबळे सर आणि डॉ.संजय घाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली छोटेखानी सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन माजी नगरसेवक राजेश उके यांनी करून दिले आणि पाहुण्यांना परिचय करून देऊन थोडक्यात समस्यांवर भाष्य करून सामाजिक कार्यकर्त्यांकडून बाबूपेठ तथा शहरातील समस्या मांडण्याचे निवेदन केले.

सामाजिक कार्यकर्त्यांकडून समस्या मांडल्या जात असतांना असे लक्षात आले की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दोन वर्षापासुन प्रशासन राज असल्यामुळे आणि प्रशासकावर अंकुश नसल्यामुळे तसेच प्रशासक सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचा बैठकीत सूर निघाला.

तसेच लोकसभेच्या निवडणूकीचे कारण सांगुन प्रशासन बाबूपेठसह शहरातिल समस्यांना बगल देत असल्याचा बैठकीचा एकंदर सूर दिसून आला.

चंद्रपूर शहरात जवळजवळ ४५ झोपडपट्ट्या आहेत.सर्व झोपडपट्ट्याचे सर्वेक्षण झाले आहे मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना अजूनपर्यंत स्थायी पट्टे देण्यात आले नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आणि स्थायी पट्टे मिळवून घेण्याकरिता नियोजनबद्ध आंदोलन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.स्थायी स्वरूपाचे पट्टे नसल्यामुळे घरकुल मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नैराश्याची भावना दिसून आली.

तसेच बैठकीत प्रकर्षाने काही प्रमुख समस्या समोर आल्यात त्या पुढील प्रमाणे :-

१) बाबूपेठ मधील जटिल बनलेला बाबूपेठ उड्डाणपूल हा ऐरणीचा विषय असून त्याचे कासवगतीपेक्षाही हळू गतीने काम सुरू असल्याचे नागरिक हैराण झाले आहेत त्याचे तात्काळ निवारण होणे गरजेचे आहे.
२) अमृतजल योजनेअंतर्गत नालीखोदकाम समान पातळीवर गेले असल्याने काहींना खूपच तर काहींना काहीच पाणी मिळत नसल्याने पाण्याचे योग्य नियोजन करावे
३) स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून मेन लाईनला जोडणाऱ्या वस्तीमधील नाल्या उघड्या न ठेवता नाल्यांचे बांधकाम अंडरग्राऊंड करावे
४) प्री पेड-पोस्ट,पोस्ट मीटर चा विरोध करण्यात यावा.
५) बाबूपेठ येथे सुसज्ज पोलीस चौकीची निर्मिती व्हावी
६) शिक्षणात मनुस्मृती शिक्षण लागू करण्यास विरोध करण्यात यावा
७) अमृतजल मिशन योजनेसाठी खोदलेल्या नाल्यावरील अजूनही सिमेंट क्राक्रिटिकरण झाले नाही
८) शहरातील अतिक्रमण काढत असतांना मोठे मासे सोडून हातावर पोट असणाऱ्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील मुद्दे बैठकीत चर्चिल्या गेलेत.
यासह इतर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत असे बैठकीत चर्चिल्या गेले.

आलेल्या समस्यावर श्री राजेश नकले यांनी भाष्य केले.

बहुजन समता पर्वाचे आयोजक डॉ. संजय घाटे सर यांनी आलेल्या समस्यांचे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरून निवारण करण्याविषयी विस्तुत मार्गदर्शन केले.तर बहुजन समता पर्वाचे निर्माते डॉ.दिलीप कांबळे सर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सदर सर्व समस्या सामाजिक मंचावर सोडवण्यासाठी आम्ही बहुजन समता पर्वाच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत असे सुचोवात केले.मात्र त्यासाठी नियोजनबद्ध कालबद्ध कार्यक्रम आयोजित करावा लागेल आणि जनतेला आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी मोठ्या प्रमाणावर सिद्ध व्हावे लागेल.आपण आपली ताकत दाखविल्याशिवाय आपल्या मागण्या आपल्या हाती पडणार नाहीत त्यामुळे आपण जमिनीवरील लढाईसाठी सिद्ध झाले पाहिजे असे डॉ.दिलीप कांबळे सर म्हणाले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गौतम गेडाम यांनी केले.

छोटेखानी बैठकीला सामाजिक कार्यकर्ते पितांबर कश्यप माजी नगरसेवक, महानंदा वाळके माजी नगरसेवक,अक्षय बोबडे,जितेंद्र डोहणे,संजय मेश्राम,शशिम पाटील,संजय बुरडकर,गुंजन साहेब,पिंटू मुन,कुरेशी साहेब,संजय कासवटे,पियुष दुपे आदींसह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बैठकिला उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.