ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️”महिला व बहुजन विरोधी मनुस्मृती” ला जागरूक नागरिकांनी विरोध करावा ! समाजसेवक गजानन हरणे यांचे आव्हान..

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री तुळशीराम जांभूळकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : केंद्र शासन धीरे धीरे राज्यघटना संपवून त्या ठिकाणी मनुस्मृति आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या पद्धतीचे अनेक बदल राज्यघटनेत ,शैक्षणिक क्षेत्रात करण्याचे काम सध्याचे गोदी शासन करीत असल्यामुळे जागरूक नागरिकांनी सावध राहून वेळीच या धोरणाला विरोध करण्यासाठी शासनावर दबाब आणावा त्यासाठी सामूहिक प्रयत्न करून लागू होत असलेल्या या मनुस्मृतीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचे आव्हान गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन यांनी जागरूक नागरिकांना केले आहे. अनेक वेळा मनुस्मृति आणणारे ते कसी चांगली आहे हे भासवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्यक्ष या मनुस्मृतीमध्ये बहुजन विरोधी,स्त्रियांविषयी किती वाईट विचार लिहिले आहे ते वाचल्यावरच तुम्हाला समजेल त्यातील स्त्रियांविषयी काही भाग पुढे दिला आहे तो असाकी
१) “व्यभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (मनुस्मृती, अध्याय ९वा. श्लोक १९)
२) “लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते, हे तिने कायम ध्यानात ठेवावे. [५/१५२] ३) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [५/१५४] ४) “स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [९/१४] ५) “पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात.” [९/१५] ६) “नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.” [९/४६] ७) “सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [२/१३] ८) “माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [२/१५] ९) “ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [३/८] १०) “जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [३/११] ११) “नवऱ्याने बायकोसोबत एका ताटात जेवण करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [४/४३] १२) “आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऐका. बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही
स्वतंत्रपणे करू नये.” [५/४७] १३) “स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [५/४८] १४) “पिता, पती, पुत्र यांच्या वेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [५/४९] १५) “पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [५/१५०] १६) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [५/१५४] १७) “पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [५/१५५] १८) “स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [५/१६२] १९) “पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [५/१६८] २०) “स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [५/१६६] २१) “पिता, पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे, सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.” [६/२] २२) “विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.’ [६/३] २३) “स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [९/१३] २४) “स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [९/१८] अशा ‘मनुस्मृती’ नावाच्या पुस्तकातील अनेक श्लोक अभ्यासक्रमात लावणेबाबत शैक्षणिक आराखड्यात उल्लेख आहे. व धीरे धीरे घटना संपवण्याचा प्रयत्न गोदी शासनाकडून चालू आहे.आपणां सर्व परिवर्तनवादी जागृत नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे कि , याला विरोध करण्यास्तव आपले लेखी म्हणणे शासनाला सादर करावे. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेचे लेटर हेड वापरून आपले अभिप्राय शासनाला कळवावेत , संघटना नसेल तर आपण परिवर्तनवादी बहुजन समाजातील नागरिकांनी तसेच मोठ्या प्रमाणात महिलांनी वैयक्तिकरित्या देखील आपला विरोध दर्शवण्याचे आव्हान गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे आव्हान केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.