ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) – शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे,समस्या व संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिवस साजरा करण्या मागील मुख्य हेतू आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन शरणम बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था चंद्रपूर चे अध्यक्ष श्री शेखर तावाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेल्पिंग हँड्स टिम चे संयोजक तथा प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री प्रदिप अडकिने होते, पर्यावरणाचा होत चाललेला ह्रास व त्या वरील उपाय योजना या संबंधी सविस्तर माहिती देत प्रत्येकाने किमान एक झाड लाऊन त्याचे संवर्धन करावे असा मानस यावेळी श्री प्रदिप अडकिणे यांनी व्यक्त केला.
विविध ठिकाणी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा द्रौपदी ताई कातकर,हरिदास देवगडे,नवनाथ तेलंग,पंचफुला भगत,दीपक भगत, चंद्रशेखर गावंडे,दमयंती तेलंग,हर्षित भसारकर,महाबोधी पूनवटकर,ऋतुराज तावाडे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.