आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गट प्रवर्तक हक्क परिषद मुंबई येथे संपन्न कंत्राटी कर्मचारी दर्जा व 10हजाार मोबदला वाढ निर्णय साठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार..

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

मुंबई – ( इंडिया 24 न्यूज ) : भूपेश गुप्ता भवन येथे राज्यव्यापी गट प्रवर्तक निर्धार परिषद आयटक ची महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्यातील जील्या जिल्या मधून प्रतिनिधी उपस्थित होत्या. राज्य व्यापी परिषेद मध्ये २७ प्रतिनिधी नी मनोगत व्यक्त केले. एकमताने ठराव संमत करण्यात आले त्यात गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या प्रस्ताव त्वरित राज्य व केंद्र सरकारने मंजूर करावा. यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्य शासनाने गट प्रवर्तक ना १०हजार मोबदला वाढ निर्णय चा शासन निर्णय काढावा.अमलबजावणी करावी. गट प्रवर्तक ना त्वरित सामाजिक सुरक्षा देऊन किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती पगारी रजा भविष्य निर्वाह निधी लागू करा. गट प्रवर्तक ना हजेरी साठी जीपिस सक्ती करु नये. राज्यातील कार्यरत गट प्रवर्तक चा एकत्रित हक्क लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सूरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गट प्रवर्तक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योग्य पद्धतीने न्यायालयीन लढा सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला.वरील ठराव संमत करण्यात आले.
परिषदेला आयटक नेते कॉ. दिलिप उटाणे, कॉ. विनोद झोडगे, कॉ. मुगाजी बुरूड, कॉ. शालुताई कुथे, यांनी मार्गदर्शन केले.


भाकप आयटक ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष लांडे यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. राज्यभरात गट प्रवर्तक चे राज्य व केंद्र सरकार आर्थिक शोषण करित आहे. गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळालाच पाहिजे व प्रत्यक योजना कर्मचारी ना किमान वेतन दीले पाहिजे. हया मागण्यासाठी आपल्या सोबत आहोत. आपले प्रश्न शासन कडे मांडण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन दिले. गट प्रवर्तक शबाना शेख, वैशाली खंदारे,सविता शेलार, समीक्षा गायकवाड, संगीता गौतम ममता खडके, वंदना बोंडे, रजनी गेडाम, सुहासिनी वाकळे, दुर्गा राउत, निर्मला वाटोळे, उज्वला चौधरी , अमिता वानखेडे, सीमा उमाळे, राधा पाटिल, येशोक्तन बोमचे, महाकलकर अश्विनी, इंदुमती , मंदा झमरे , रंजना जाधव, मंदाकिनी पाटिल विदयदेवी येजुलवार, हर्षा खडसे, फर्जना शेख, मीना कायदेकर, जयश्री देशमुख, सुनीता कुलकर्णी, कल्पना कोकणी आदींनी मनोगत वेक्तं केलें. परिषदेचे अध्यक्ष राजू देसले यांनी गट प्रवर्तक ना न्याय मिळवून देण्यासाठी गट प्रवर्तक ठराव ची अमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार शबाना शेख यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.