ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्राकरीता दाखले वेळेतच उपलब्ध करून द्यावे..

▪️राहुल पावडे यांची निवासी उप जिल्हाधिका-यांशी चर्चा करून निवेदन सादर

 

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

चंद्रपूर : ( इंडिया 24 न्यूज ) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाकरिता आवश्यक असलेले शैक्षणिक संदर्भात प्रमाणपत्रे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, करिता निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याशी दि. 7 जून रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व भाजपा शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन सादर केले.

सध्या विद्यार्थ्यांची नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेशाकरीता लागणारे कागदपत्रे वेळेतच मिळायला हवे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात येत आहेत. अशावेळी त्यांना सोयीस्कर होईल, यादृष्टीकोनातून संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना सूचना देवून आणि एक वेळ आखून देत सदर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केल्यास पुढील प्रवेशाकरीता वेळेचा खेळखंडोबा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच याबद्दल एक विशेष बैठक घेण्याची मागणी सुद्धा भाजप शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही देण्यात आले आहे. तसेच तहसील कार्यालय मध्ये बॅनरद्वारे सूचना मदत कार्य सुरू करण्यात यावे, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास संपर्क सुद्धा साधने सुलभ होईल. सर्व विद्यार्थ्यांना भाजप महानगरच्या वतीने आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

सदर निवेदन देतांना भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह रामपाल सिंग, प्रज्वल कडू, सुरज पेदुलवार, किरण बुटले, रवि चहारे, चांद सय्यद,धमा भस्मे ,पुरुषोत्तम साहारे, रवी लोणकर,  रेणू घोडेस्वार, मनीषा महात

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.