आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नगरपालिका प्रशासनातर्फे वृक्ष लागवडीसाठी बीयांचे वाटप..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे, दिनांक 12 जून, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : स्वच्छ भारत अभियान 2.0 व माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात प्रशासनामार्फत 50 लक्ष वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नगरपालिका प्रशासनातर्फे धुळे महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या मोकळया जागेत वृक्ष लावण्यासाठी झाडांच्या बीयांचे वाटप जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विविध झाडांच्या बीयांचे वाटप जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धुळे महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम, जिल्हा सहआयुक्त शिल्पा नाईक, मुख्याधिकारी शिरपूर, प्रशांत बीडगर, मुख्याधिकारी शिंदखेडा, देवेंद्रसिंग परदेशी, साक्री व पिंपळनेर येथील लेखापाल आरती काळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांच्या बीयांद्वारेही रोपे तयार करावे, जेणेकरून वृक्ष लागवडीसाठी या रोपांची मदत होईल. यासाठी शाळांमधून असा उपक्रम राबवून बियांपासून रोपे तयार करावेत. तयार रोपे मोकळया जागेत लावणे सोईचे होईल. तसेच वनीकरण व कृषी विभागाच्या नर्सरीमधून रोपे घेऊन कार्यालयाच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत वृक्ष लावावेत.

जिल्हा सहआयुक्त शिल्पा नाईक म्हणाल्या की, जिल्ह्यात 50 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून नगरपरिषद विभागास 5 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यानुसार रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी बीयांचे वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी हातभार लागणार आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळयात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचा मानस डोळयासमोर ठेवून त्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील नागरीक, पालिका कर्मचारी, शाळा, कॉलेज, सेवाभावी संस्था इत्यादींचा सहभाग घेऊन सीड बाल (SEED BALL) ही संकल्पना रावबून पावसाळयात पालिका स्तरावरुन पालिका कर्मचारी, शाळा, कॉलेज, सेवाभावी संस्था इत्यादीच्या सहयोगाने जास्तीत जास्त वृक्ष लागवडीसाठी आज झाडांच्या बीयांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्ह्यातील नगरपालिका मुख्याधिकारी यांना प्रतिनिधीक स्वरूपात बीयांचे वाटप करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.