आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धुळे जिल्ह्यात 25 जूनपर्यंत कायदेविषयक जनजागृती व फिरते लोक अदालतीचे आयोजन..

 

संपादक सौ. शिल्पा बनपुरकर

धुळे, दिनांक 13 जून, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वैकल्पित वाद सोडवण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना राबवल्या जातात. यातीलच “न्याय आपल्या दारी” उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात 25 जूनपर्यंत कायदेविषयक जनजागृती तसेच फिरते लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या फिरत्या लोक अदालतीचा व फिरत्या कायदेविषयक जनजागृती शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांनी केले आहे.


न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने फिरते लोक अदालतीचे उद्घाटन न्या. माधुरी आनंद, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे तथा अध्यक्ष, धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस. आर. भदगले, जिल्हा न्यायाधीश जे. आर. पुलाटे, कौटूंबिक न्यायाधीश स्वर्णिका महाले, तिसरे दिवाणी न्यायाधीश एस. एस. सैय्यद, चवथे दिवाणी न्यायाधीश व्ही. जी. चव्हाण, पाचवे दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. मडके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप स्वामी, न्यायालयीन कर्मचारी व वकील उपस्थित होते.
फिरते लोक अदालतीचे आयोजन 14 जून रोजी सांगवी, ता. शिरपूर, दि. 18 जून रोजी अमळथे, ता. शिरपूर, 20 जून रोजी रामी, दोंडाईचा, ता. शिंदखेडा येथे तर 24 जून रोजी सामोडे, ता. साक्री येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फिरत्या कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन पळासनेर ग्रामपंचायत, ता. शिरपूर, 19 जून रोजी अजंदे, ता. शिंदखेडा, 21 जून रोजी लंघाणे, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, 25 जून रोजी माहिर, ता. साक्री येथे आयोजन करण्यात आले आहे.
धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित केलेल्या फिरत्या लोक अदालत व कायदेविषक जनजागृती अभियानात आपसातील वाद असलेली दाखल पुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र असे फौजदारी प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करून कायमची निकाली काढावी व आपला वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माधुरी आनंद यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.