आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाची तसेच संबंधित कंपनी व्यवस्थापनाची मदत तात्काळ देण्यात यावी ही आमची मागणी आहे.

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

अकुशल कामगारांच्या हाती ५०० किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेतली न जाणे, सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध न करून देता त्यांना काम करायला लावणे या बेजबाबदारपणाला कंपनी व्यवस्थापनासोबतच सरकारची प्रशासकीय व्यवस्था सुद्धा जबाबदार आहे. स्फोट झाल्यानंतर जखमींना तात्काळ मदत मिळणे आवश्यक असताना दीड तासाने रुग्णवाहिका मदतीला पोहचते हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. यामुळे निष्पाप कामगारांचा जीव गेला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडे फक्त जाब मागून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने आणि प्रशासकीय यंत्रणेने यावेळी करू नये. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कुठे झोपी गेले याचे उत्तर सरकारने द्यावे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.