आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आम आदमी पार्टी वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राची स्मार्ट मीटर योजने संदर्भात व निवडणूक आढावा बैठक संपन्न..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

भद्रावती – ( इंडिया 24 न्यूज ) : दिनांक 18/06/2024 रोजी मंगळवार ला जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात वरोरा – भद्रावती विधानसभा निवडणुक आढावा व स्मार्ट मीटर विरोधात मुंबई येथे आंदोलन विषयी बैठक संपन्न झाली. बैठक वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले यांनी आयोजित केली व भद्रावती येथील शासकीय विश्रामगृहात भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम यांनी आयोजित केली. या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे संघटन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, युवा विदर्भ संघटनमंत्री प्रणित डोंगरे व जिल्हा सचिव प्रशांत सिदुरकर उपस्थित होते.
स्मार्ट मीटर विरोधात नुकताच आम आदमी पार्टी ने राज्यव्यापी आंदोलन करून स्मार्ट मीटर विषयी स्थगिती देण्यास राज्य सरकार ला भाग पाडले. परंतु ही स्थिगीतीचे आश्वासन तोंडी असून कुठेच लेखी स्वरूपात देण्यात आली नसून विधानसभा निवडणुकी पुरता आहे. विधानसभा निवडणूक झाल्यावर ही स्मार्ट मीटर योजना पुन्हा महाराष्ट्राच्या गोर गरीब शेतकरी वर्गावर व सामान्य परिवारावर लादण्यात येणार आहे. त्या करिता येत्या काही दिवसात आम आदमी पार्टी च्या माध्यमातून भव्य आंदोलन मुंबई मधे होणार असून तिथं संपूर्ण महाराष्ट्राची जनता एकत्रीत येऊन स्मार्ट मीटर योजने विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे व या तानाशाही सरकार ला ही स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यास भाग पाडणार आहे. येत्या काळात आम आदमी पार्टी कडून संपूर्ण महाराष्ट्र मधे विधानसभा निवडणुक स्वबळावर लढणार आहे व काही दिवसात याची जाहीर घोषणा सुद्धा करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी महाराष्ट्राचे संघटन सचिव भूषण ढाकुलकर यांनी दिली. यावेळी भद्रावती शहराध्यक्ष अनिल कुमार राम, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनाल पाटील, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपळशेंडे, वरोरा शहर अध्यक्ष बंटी खडके, विनीत निमसरकर, सचिन पाटील, प्रफुल शेलार, रितेश नगराळे, प्रेम दुधलकर,दिलीप कापकर(चांडणखेडा), राजकुमार चट्टे, बाळूभाऊ बांदुरकर, राहुल सोनटक्के (संस्थापक झोपडपट्टी विकास संघटना म.राज्य), संदीप भाऊ चटपकर सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.